रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा...


आमदार नितेश राणे यांचा इशारा




मुंबई (प्रतिनिधी) : त्रिपुरामधील कथित घटनेच्या विरोधात रझा अकादमीने शुक्रवारी राज्यात काही ठिकाणी काढलेल्या मोर्चांना हिंसक वळण लागले होते. त्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आघाडी सरकारने रझा अकादमीवर लवकरात लवकर बंदी घालावी. अन्यथा त्यांना कसे संपवायचे ते आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये बघू, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.


ज्या पद्धतीने रझा अकादमीने ही दंगल घडवली आहेत, त्याची माहिती आमच्याकडे आहे, असे सांगून नितेश राणे म्हणाले, शुक्रवारी एका वेगळ्या उद्देशाने मोर्चा काढला गेला. हिंदूंना दबावात आणण्यासाठी हा मोर्चा होता.


महाराष्ट्रात जी दंगल उसळली त्याच्या पाठीमागे अतिरेकी संघटना रझा अकादमीच आहे. सरकारने त्यांच्यावर बंदी घालावी अन्यथा, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू, असा इशारा त्यांनी दिला.


रझा अकादमीला भाजपाचे पिल्लू म्हणणारे संजय राऊत यांचाही नितेश राणे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, संजय राऊत आणि शिवसेनेने आपला आत्मा सत्तेसाठी विकला आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या भाषणाची सीडी पाठवणार आहे. ती भाषणे ऐकल्यावर संजय राऊतांना कळेल की, सेनेची ओरिजनल भूमिका काय होती! तसेच ही रझा अकादमी हे महाविकास आघाडीचेच चौथे पिल्लू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.


...तर अशा घटना होतच राहतील - निलेश राणे


त्रिपुरामध्ये घटना घडलीच नाही तरी, हिंदू समाजाला त्रास देण्यासाठी महाराष्ट्रात मोर्चे काढले गेले. रझा अकादमीच्या लोकांना आत्ताच ठेचले नाही तर अशा घटना नेहमी होत राहतील. याच रझा अकादमीने आझाद मैदानात देखील मोर्चा काढला होता आणि अनेक पोलीस बांधवांवर हात उचलले होते, असे भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा