मुंबईत सेक्स टुरिझमचा पर्दाफाश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने ‘सेक्स टुरिझम’चा पर्दाफाश केला आहे. यावेळी दोन महिलांना अटक करण्यात आली असून दोन तरुणींचा सुटका करण्यात आली. एक महिला आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून सेक्स टुरिझम चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता. संबंधित आरोपी महिलेला याआधीही २००२ मध्ये अनैतिक वाहतूक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.


पोलिसांनी ग्राहक असल्याचा बनाव करत सापळा रचला होता. त्यानंतर आरोपीने गोव्याची ट्रिप आयोजित करत दोन मुलींना सोबत पाठवण्याची तयारी दर्शवली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी विमानतळावरच अटकेची तयारी केली होती. तिथे तीन तरुणी, अधिकारी आणि ग्राहकाच्या वेषात असणाऱ्या इतरांना भेटल्या असता कारवाई कऱण्यात आली. यावेळी पैसे आणि विमान तिकीटांची देवाण - घेवाण करण्यात आली. सिग्नल मिळताच तिन्ही तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशी केली असता पोलिसांना मुख्या आरोपीची माहिती मिळाली. मुख्य आरोपी असणाऱ्या महिलेने डिपार्चर गेटमधून प्रवेश करत बोर्डिंग पास घेतला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या दुकाने आस्थापना विभागातील रिक्त पदे भरणार

सुविधाकारांची ४८ रिक्तपदे खात्यांतर्गत लिपिकांमधून भरणार ऑनलाईन परीक्षेसाठी आयबीपीएस संस्थेची निवड मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालय २० ते २५ मिनिटे अंधारात

शॉर्टसर्कीटमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित कोट्यवधीचा अर्थसंकल्प, पण महापालिका मुख्यालयात लिफ्टच्या

वांद्रे आणि खार पश्चिम भागात रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्‍या जल अभियंता विभागामार्फत वांद्रे पश्चिम येथील पाली हिल

अनुसूचित जातीच्या विविध रिक्त्त पदांच्या भरतीचा अनुशेष भरा!

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश मुंबई (खास प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य

मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस पाइपलाइन गळतीमुळे लागली आग

मुंबई : कुर्ला पश्चिमे येथील विनोबा भावे नगरमधील एलआयजी कॉलनीच्या मागे असलेल्या मुबारक इमारतीत दुपारी गॅस

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांच्या न्यायाची हमी

मुंबई : ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहीत धरण्याची तरतूद