पोलादपूर शहरातील भूमिगत रस्त्यासंदर्भात मनसे आक्रमक

  89



शैलेश पालकर


पोलादपूर : पोलादपूर शहरामध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर भूमिगत रस्त्याच्या चुकीच्या नियोजनामुळे त्रस्त नागरिक आणि विद्यार्थी वर्गाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून सोमवारी केलेल्या स्वाक्षरी आंदोलनानंतर आता लवकरच जनतेसोबत आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मनोदय मनसे शहराध्यक्ष दर्पण दरेकर यांनी व्यक्त केला.


पोलादपूर शहरामधून भूमिगत जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यावर मंजूर आराखड्यात केवळ एक ब्रिज मंजूर असताना त्यापेक्षा जास्त चार ब्रिज अनावश्यक ठिकाणी बांधून मोठ्या प्रमाणात काही व्यक्तींसाठी सरकारी पैशांची उधळण सुरू आहे. पोलादपूर शहराचे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सद्यस्थितीतील अस्तित्व या भूमिगत महामार्गामुळे आता सर्व्हिस रोडवर आले आहे. प्रभातनगर पूर्व व पश्चिम या लोकवस्त्यांसह रयत शिक्षण संस्थेचे हायस्कूल, गोकुळनगर, जाखमातानगर, आनंदनगर भैरवनाथनगर, तांबडभुवन आणि काटेतळी रोड या भागातील नागरिकांना मोठा वळसा घालून जाण्याची वेळ भविष्यात ओढवणार आहे किंवा या लोकवस्त्यांसाठी पोलादपूर एस.टी.स्थानकासमोरील भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामागील एका पुलासोबतच एस.टी. स्थानकाच्या उत्तरेकडील वाहन आत शिरण्याच्या मार्गासमोरपर्यंतच्या साधारणपणे तीनशे ते चारशे मीटरपर्यंत आणखी चार ब्रिज बांधण्यात येत आहेत. यापैकी एक ब्रिज पूर्ण झालेला दिसून येत आहे.


महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या रूंदी आणि लांबीसह गटारे आणि फूटपाथ याबाबत मोठ्या प्रमाणात साशंकता निर्माण होणारी परिस्थिती दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे बाधितांच्या समितीचे स्वार्थापुरते रूपांतर करून मोबदला घेऊनही ताबा न देणाऱ्यांना आता नव्याने आंदोलन करणाऱ्या ठेकेदारधार्जिण्या समाजसेवकांचे आव्हान उभे राहिले असून या समाजसेवकांनी उपठेकेदारीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका साध्य केली आहे. या सर्व प्रश्नी पोलादपूर तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रशासनाची तयारी नसून ज्यांनी मोबदला घेऊनही जमिनीवरील इमारतींचा ताबा सोडला नाही. अशा नेतृत्व करणाऱ्यांचे ऐकणे प्रशासनाप्रमाणेच ठेकेदारांनाही भाग पडले आहे. यामुळेच जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष करून सध्या महामार्गाचे पोलादपूर शहरातील काम केवळ बाधितांच्या समितीचा स्वार्थासाठी उपयोग करणाऱ्यांच्या मर्जीने सुरू असल्याची नाराजी अजूनही पोलादपूरकर नागरिक उघडपणे व्यक्त करताना दिसून येत नाहीत.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलादपूर शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांना ओलांडता यावा म्हणून पोलादपूर शहराचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ देवस्थान कमानीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ सुरक्षितपणे भुयारी मार्ग करण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत एक हजारांहून जास्त विद्यार्थी अन् नागरिकांनी सहभाग घेतला. या स्वाक्षरी मोहिमेद्वारे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया या आस्थापनेला देण्यात आलेल्या निवेदनाचा परिणाम न झाल्यास लवकरच सर्वच समाजधुरिणांच्या पाठिंब्यावर बिगरराजकीय प्रकारचे व्यापक आंदोलन छेडण्याचा मनोदय दर्पण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.


 

Comments
Add Comment

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना