मुंबई : कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत नवनव्या संकल्पना (इनोव्हेटिव्ह आयडियाज) अंतर्गत मध्य रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ स्थापित केले आहे. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेला रेल्वे कोच वापरून बनवण्यात आले आहे, जे या भागातील खाद्यालय बनेल. रूळांवर ठेवलेले ‘रेस्टॉरंट कोच’ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हेरिटेज गल्ली येथे, प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या समोर आहे. हेरिटेज गल्लीमध्ये नॅरोगेज लोकोमोटिव्ह्ज, जुन्या प्रिंटिंग प्रेसचे भाग इत्यादींसह विविध रेल्वे कलाकृती आहेत.
‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ एक उत्तम जेवणाचे ठिकाण असेल जे जेवणाऱ्यांना एक अनोखा अनुभव देईल. कोचमध्ये १० टेबलसह ४० व्यक्ती राहतील. रेस्टॉरंटचे आतील भाग अशा प्रकारे सजवले गेले आहे की प्रवासी तसेच लोकांना, रेल्वे-थीम असलेल्या सेटिंगमध्ये जेवणाचा अनुभव घेऊ शकतील.
या प्रसंगी श्री बी. के. दादाभोय, अतिरिक्त महाव्यवस्थापक, मनोज शर्मा, मुख्य प्रशासनिक अधिकारी (बांधकाम), गोपाल चंद्रा, प्रिन्सिपल चीफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर, मुकुल जैन, प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक, मणि जीत सिंह, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, एस. के. पंकज, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, आलोक सिंह, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी, ए. के. श्रीवास्तव, प्रिंसिपल चीफ सिग्नल व टेलिकम्यूनिकेशन्स इंजिनियर, आर. एल. राणा, प्रधान मुख्य सामग्री व्यवस्थापक, शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुंबई आणि मध्य रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…