Friday, July 19, 2024
Homeक्रीडा‘चूक’ सुधारत पाकिस्तानची नवी जर्सी लाँच

‘चूक’ सुधारत पाकिस्तानची नवी जर्सी लाँच

यूएईऐवजी लिहिले होते भारत

लाहोर (वृत्तसंस्था) : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चूक सुधारत टी-ट्वेन्टी वर्ल्डकप संघाची नवी जर्सी लाँच केली आहे. आधीच्या जर्सीवर यूएईऐवजी लिहिले होते भारत असे लिहिले होते. यंदाचा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारतात होत नसला, तरी बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करत आहे. कोरोना महामारीमुळे, बीसीसीआय आणि आयसीसीने परस्पर संमतीनंतर हे ठिकाण ओमान आणि यूएईला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. आयसीसीच्या नियमांनुसार, आयसीसी स्पर्धेतील सर्व संघांना त्यांच्या जर्सीवर उजव्या बाजूला यजमान देशाचे नाव आणि वर्षासह स्पर्धेचे नाव लिहिणे अनिवार्य आहे. मात्र आता पाकिस्तानने भारताच्या नावासोबत वर्ल्डकपसाठी नवी जर्सी लाँच केली आहे.

पाकिस्तान संघ भारतासह दुसऱ्या गटामध्ये आहे. या गटात भारताशिवाय अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ देखील सहभागी आहेत. भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी २४ ऑक्टोबर रोजी आमनेसामने आहेत. पाकिस्तानने २००९ मध्ये टी-ट्वेन्टी विश्वचषक ट्रॉफी जिंकली, तर २००७ मध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.

विश्वचषकापूर्वीही दोन्ही देशांचे चाहते आणि क्रिकेटपंडित हे सोशल मीडियावर वादविवाद करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) त्यांच्या वर्ल्डकप जर्सीबाबत केलेल्या एका गोष्टींमुळे चर्चेत आला होता. व्हायरल झालेल्या जर्सीच्या फोटोंमध्ये पाकिस्तानने भारताऐवजी यूएईचे नाव लिहिले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -