Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडावेटलिफ्टिंग : चैतन्य हेल्थकेअरला तीन जेतेपदे

वेटलिफ्टिंग : चैतन्य हेल्थकेअरला तीन जेतेपदे

Weightlifting: Chaitanya Healthcare wins three titles

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई उपनगर वेटलिफ्टिंग संघटना आयोजित कनिष्ठ (ज्युनियर) आणि वरिष्ठ (सीनियर) पुरुष आणि महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत चैतन्य हेल्थकेअर सेंटर, गोरेगावने हॅट्ट्रिक साधली. त्यांच्या खेळाडूंनी ज्युनियर मुले आणि सीनियर गटांमधील दोन्ही जेतेपदांवर शिक्कामोर्तब केले.

संत रोहिदास सभागृह, धारावी येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांमध्ये ४५ किलो गटात कांचन धुरी (चैतन्य हेल्थकेअर) विजेती ठरली. ४९ किलो गटात मानसी आहेर (एम्पायर), ५५ किलो गटात खुशी काटे, ५९ किलो गटात अपर्णा जगताप, ६४ किलो गटात निशा साटम, ७१ किलो गटात मनाली साळवीने (सर्व चैतन्य हेल्थकेअर) बाजी मारली. ८७ किलो गटात रेणुका नलावडे (केईएस कॉलेज) तसेच ८७ किलोवरील गटात मारिया पटेल (चैतन्य हेल्थकेअर) विजेत्या ठरल्या. ज्युनियर मुले गटात ५५ किलो गटात मुंबई फिटनेसचा सर्वेश दिनकर विजेता ठरला. चैतन्य हेल्थकेअरच्या हर्ष शर्माने ६१ किलो गटात, सावरकर जिमच्या जमील खानने ६७ किलो गटात, केईएस कॉलेजच्या यश ठाकूरने ७३ किलो गटात, चैतन्यच्या मितेश शिंदेने ८१ किलो गटात तसेच केईएस कॉलेजच्या दर्श नायरने ८९ किलो गटात, चैतन्यच्या जितेन राणेने ९६ किलो गटात, पाटेकर जिमच्या अभिषेक पाटेकरने १०२ तसेच केईएस कॉलेजचे ध्रु नायरने १०९ किलो गटात जेतेपद पटकावले.

सीनियर पुरुष गटात ५५, ६१, ६७ तसेच ७३ किलो गटात चैतन्यच्या अनुक्रमे चंदन शिवलकर, भरत पटवारी, कौशल शर्मा यांनी बाजी मारली. ८१ किलो गटात स्मिताई फिटनेसच्याचा अक्षय कारंडे, ८९ किलो गटात चैतन्यचा सुरेश प्रसाद, ९६ किलो गटात मुंबई फिटनेसचा मोहन साटम, १०२ किलो गटात नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचा गौरव भोला, १०९ किलो गटात चैतन्यचा संदीप नवले तसेच १०९ किलोवरील गटात आचार्य कॉलेजचा अजित पाटील विजेता ठरला.

या स्पर्धेला पोलीस अधिकारी सुशील जाधव यांचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबई उपनगर वेटलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस सिद्धार्थ चुरी, महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस सैदल सोंडे, मुंबई पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय बडे, उपनगर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष विनायक राणे, आरीफ शेख, उपनगर वेटलिफ्टिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीप नवले, क्रीडाप्रेमी रामचंद्र गावडे, प्रथमेश कीर्द आणि छत्रपती पुरस्कार विजेते मनोज मोरे यांच्यासह स्वप्नील कारंडे, मनसे विभाग अध्यक्ष राजेश सोनावणे, १९ वर्षांखालील प्रशिक्षक महेश येतकर, अलाउद्दीन अन्सारी आणि आकुब मनसुरी यांचे सहकार्य लाभले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -