लसीकरणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत वाद


ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरातील नागरिकांचे लसीकरण ठामपा करीत असताना लसीकरण केंद्रात मात्र शिवसेनेच्या नेत्यांचे पोस्टर्स लागलेले आहेत. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचे मॅन्युफ्रॅक्चरिंग शिवसेनेने सुरू केले आहे का? महाराष्ट्र सरकारमार्फत ठामपाला आणि ठामपाच्या मार्फत ते ठाणेकरांना देण्यात येते. याचे श्रेय महाविकास आघाडीला आहे, शिवसेनेला नाही, याची जाणीव खा. शिंदे यांनी ठेवावी, असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला आहे.


कळवा येथे अज्ञात इसमाने राष्ट्रवादीने लावलेले कोरोना लसीकरणाचे आवाहन करणारे पोस्टर फाडले आहे. या पोस्टरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांचे फोटो होते. या पोस्टरवरून नागरिकांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. हे पोस्टर पहाटे तीनच्या सुमारास फाडण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.



तर आमची जबाबदारी नाही- डॉ. आव्हाडांचे ट्विट


पोस्टर फाडल्याची घटना समजल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कळव्यामध्ये लसीकरणाच्या मोहिमेची लोकांना माहिती देण्यासाठी म्हणून लावण्यात आलेले बॅनर काही लोकांनी फाडले. त्याबद्दल पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही उग्र भूमिका घेतली, तर त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.


https://twitter.com/Awhadspeaks/status/1449251567215861761
Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून