मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना काळात मुंबई महापालिकेने जम्बो कोविड केंद्र सुरू केली होती. ही कोविड केंद्र डिसेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट थोपवण्यासाठी पालिकेने मुंबईत जम्बो कोविड केंद्र उभारली होती. ही कोविड केंद्र कोरोना रुग्णांच्या सेवेत तत्पर होती, मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, यामुळे गोरेगाव, वांद्रे-कुर्ला संकुल या ठिकाणी अनेक खाटा रिक्त आहेत, तर मालाड, सोमय्या मैदान, कंजूरमार्ग येथे पालिका नव्याने कोविड केंद्र सुरू करत असून हे कोविड केंद्र पालिका काही खासगी रुग्णालयांना चालवण्यासाठी देणार आहे. मात्र इतर केंद्रप्रमाणे न चालवता पालिका खासगी रुग्णालयांना का देते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागच्या आठवड्यात काही प्रमाणात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढताना दिसला. तथापि, सध्या कोरोना रुग्णसंख्या फारच कमी आहे महापालिकेने तिसरी लाट येण्याची शक्यता नसल्याचे सांगितले असले तरी खबरदारी म्हणून डिसेंबरपर्यंत ही कोविड केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.