दसरा मेळाव्यात तेच मुद्दे, तेच विषय
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेला दिलेले वचन मोडले नसते तर कदाचित आज ना उद्या तुम्ही देखील पुन्हा मुख्यमंत्री झाला असतात. पण तुमच्या नशीबात नव्हते. म्हणून तुम्ही वचन मोडले. मी हे पद स्वीकारले, एका जबाबदारीने स्वीकारले, असे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. स्वतःच्या अंगात हिंमत असेल तर समोरुन लढा द्या. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचे हे मर्दाचे लक्षण नाही, असे ते म्हणाले.
भाषणातील ठळक मुद्दे –
– सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंमत असेल तर पाडून दाखवा. तसे करून पडत नाही म्हणून छापा-काटा सुरू झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा.
– माझे भाषण कधी थांबते आणि कधी एकदा चिरकतो, अशी काहींची अवस्था आहे. कारण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणे, चिरकणे यातूनच त्यांना रोजगार मिळतो.
– भाजप देशातील नव्हे, तर जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करतं. पण यांच्याकडे पोटनिवडणुकीसाठी देखील उमेदवार नाहीत.
महाराष्ट्रात लोकशाहीचा खून झाला, असा गळा भाजपाचे लोक काढतात. आहेत. मग उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा फुललाय का?
– महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून होणारी ढवळाढवळ खपवू दिली जाणार नाही. यासाठी सर्वांनी एकत्र होऊन लढा उभारला पाहिजे. जसे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींने दाखवून दिले, तसे तुम्ही दाखवले पाहिजे.
– महिलांवरी अत्याचार हे देशभर वाढत आहेत. विधानसभेचे अधिवेशन कशाला. आपण मोदीजींना सांगा आणि संसदेचे अधिवेशन आठवडाभर घ्या.