दसऱ्याचा शिमगा करून टाकला : चंद्रकांत पाटील



मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याचा शिमगा केला. केंद्राच्या आणि भाजपच्या नावाने शिमगा करता येईल तेवढा उद्धव ठाकरे यांनी केला, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.


उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर टीका केली. त्याला चंद्रकांच पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. केंद्राच्या नावाने शिमगा करून काय उपयोग? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीबाबत काय, असे सवाल त्यांनी केले. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या, राज्यात ड्रग्ज, गांजाचे प्रकार वाढले, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.


स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही कुठे होता, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, हे चिंताजनक आहे. यासाठी इतिहास वाचावा लागतो, स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही कोठे होता? तुमचा जन्म झाला नव्हता. पण स्वातंत्र्य लढ्यात शिवसेना कुठे होती? स्वातंत्र्यलढा तीव्र झाल्यानंतर डॉ. हेडगेवारांनी संघ स्थगित ठेवला आणि स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा संघाची सुरुवात केली. हा इतिहास आपल्याला माहीत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सुनावले.


आणीबाणीमध्ये अनेक पत्रकार, संघाचे लाखो कार्यकर्ते जेलमध्ये गेले होते, तुम्ही काय केले होतं? असा प्रश्न विचारत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. आजच्या भाषणात कशाचा कशाला धागा जुळत नव्हता. लष्करी संग्रहालयाबद्दल बोलले, पण दोन वर्षांत शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाल, असा सवाल त्यांनी केला.

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून यासाठी पंतप्रधान

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती मुंबई : गोरेगावच्या नेस्को

ठाकरे बंधूंच्या 'युती'आधीच राजकीय 'बॉम्ब'! 'युती'चा सस्पेन्स कायम!

महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने धुरळा नव्हे तर चक्क चिखलफेक पहायला मिळाली. सर्वांचं

'उद्धव ठाकरेंनी माझे हजार रुपये वाचवले' फडणवीसांची मार्मिक टिप्पणी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कात केलेल्या भाषणावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

'व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा आणि फेसबुक लाईव्ह करणारा मी नाही,' एकनाथ शिंदेंचा पलटवार मुंबई: दसऱ्याच्या

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड: