
मुंबई (प्रतिनिधी) : ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन हा आर्थर रोड जेलमध्ये कैदी नंबर ९५६ असेल. कारागृहातील प्रत्येक कैद्याला एक नंबर दिला जातो. या क्रमांकाला कारागृहातील कैदी क्रमांक असेही म्हणतात. कारागृहातील कोणत्याही कैद्याला त्याच्या नंबरवरून कॉल केला जातो.
अशाप्रकारे आर्यन खानला कॉल करण्यासाठी ९५६ क्रमांकाचा वापर केला जाईल. आर्यन खान तुरुंगात राहील तोपर्यंत त्याला या नंबरवरून फोन केला जाईल.
मुंबईत क्रूझमध्ये आयोजित ड्रग्ज पार्टीवर एनसीबीच्या छाप्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह चौघांना एनसीबीने पकडले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याच्या जामीन अर्जावर २० ऑक्टोबरला निकाल सुनावला जाणार आहे. सध्या आर्यन खान मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. त्याचे वडील शाहरुखने मनीऑर्डरद्वारे ४५०० रुपये पाठवले आहे.