ज्योती जाधव
कर्जत : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्जत बाजारपेठेत फुलबाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. भाववाढीनंतरही झेंडूच्या खरेदीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
घाऊक बाजारात पिवळा आणि केशरी झेंडूच्या फुलाला दर्जानुसार प्रतिकिलोमागे १५० ते २०० रुपये भाव मिळत आहे. तसेच, शेवंतीच्या फुलांना १०० ते १४० रुपये भाव मिळत आहे. त्याचप्रमाणे छोट्या झेंडूला ७० ते ८० रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. मात्र, ग्राहकांची अडचण झाली असूनही झेंडूचे फुले खरेदी करत आहे.
बाजारात राज्यभरातून फुलांची आवक होत आहे. ही आवक मागणीच्या तुलनेत पुरेशी असल्याने भावात मोठी वाढ झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दीड वर्षांनंतर मंदिरे व धार्मिक स्थळे खुली झाली आहेत. त्यामुळे हेच भाव काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी ऋषिकेश गायकवाड यांनी व्यक्त केला.
मागील वर्षी याच दिवसांत शहरात लॉकडाऊन होता. तसेच, मंदिरे व धार्मिक स्थळे बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड केली नव्हती. मात्र, शासनाने मंदिर खुले करण्याचे आदेश दिल्याने आता फुलांची मागणी वाढली असून त्याप्रमाणे किंमतीत भरसाठ वाढ झाली आहे. मात्र, हे भाव सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.