नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायतमधील शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पनवेल येथे त्या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला असून आमदार आणि पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
पाषाणे ग्रुपग्रामपंचायतमधील पाषाणे, माले, आसे या गावांतील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पनवेल येथे पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेना पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आमदार आणि भाजप जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. भाजप कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, युवक कार्यकर्ते किरण ठाकरे, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील आणि युवा मोर्चा तालुका सरचिटणीस राहुल बदे आदी उपस्थित होते.
पाषाणे ग्रामपंचायतमधील सदस्य रोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संभाजी वेहेले, दशरथ वेहेले, निलेश ऐनकर, नरेश धुळे, जगदीश धुळे, किरण नाईक, रोशन पाटील, समीर निचिंदे, सतीश जोशी, गणेश दिघे, सतीश दिघे, हेमंत निचिंदे, राम जोशी, सुनील दळवी, अविनाश जोशी या कार्यकर्त्यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…