समीर वानखेडेंना लवकरच समन्स

मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस समन्स पाठवणार असल्याचे समजते. काही दिवसांपुर्वी खुद्द समीर वानखेडे यांनीच राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे आपल्यावर काही पोलीस पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. त्याच तक्रारीनंतर वानखेडे यांना समन्स पाठवले जाणार आहेत. त्याच तक्रारीचा भाग म्हणून त्यांची चौकशी केली जाईल.


मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ११ ऑक्टोबर रोजी, आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला होता. त्यांनी याबाबत मुंबई पोलिसात तक्रार देखील केली होती. तसेच मुंबई पोलिसांना याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजे देखील मिळाल्याची माहिती वानखेडे यांनी दिली होती. वानखेडे यांनी स्वत: त्याबाबतचे पुरावे पोलिसांना दिलेले आहेत. या सर्व प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी दोन पोलिसांची चौकशीदेखील केली. तसेच आता मुंबई पोलीस वानखेडे यांना समन्स पाठवणार आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती आहे.



मलिक यांच्या आरोपांना दिले उत्तर


एनसीबीने २ ऑक्टोबरला क्रूजवर टाकलेला छापा, त्यातून अटक करण्यात आलेला शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि या सर्व प्रकरणावर नवाब मलिक यांनी केलेले आरोपांबाबत राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मलिक यांनी आपला जावई समीर खान याला एनसीबीने अडकवल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी न्यायालयाचा अहवाल आणि त्यापाठोपाठ समीर वानखेडे यांचा नंबर देखील जाहीर केला आहे. त्यानंतर आता समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी यावेळी या प्रकरणावर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. वानखेडे म्हणाले, ‘सध्या हे प्रकरण वरच्या कोर्टात आहे. अशा प्रकरणामध्ये आपण त्यावर काही बोलू शकत नाही’.

Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल