भारतीय जवान पाकिस्तानला पाठवत होता गुप्त माहिती

जोधपूर : भारताच्या लष्करी जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून देशातील महत्त्वाची माहिती मिळवण्याचे काम 'आयएसआय' या पाकिस्तानी एजन्सीच्या महिला करत आहेत. अशातच जोधपूर मिलिटरी इंजिनीअरींग सर्व्हिसचे कर्मचारी राम सिंह हे या महिलेच्या जाळ्यात अडकले. आणि सीमेपलीकडील पाकिस्तानी महिलांना देशाच्या सुरक्षेची गोपनीय माहिती पाठवण्यास सुरुवात केली. याप्रकरणी राम सिंगला अटक झाली असून त्याची चौकशी होत आहे तसेच जयपुरमधील गुप्तचर संस्थांकडून पुढील चौकशी करण्यात येणार आहे.


सुरक्षा एजन्सी एमईएसमध्ये मल्टी टास्किंग सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या राम सिंगवर लक्ष ठेवून आहे. गेले तीन महिने राम सिंग व्हॉट्सऍपद्वारे देशाची गोपनीय आणि धोरणात्मक माहिती सीमेपलीकडील आयएसआय या पाकिस्तानी संस्थेला पाठवत होता.


प्राथमिक चौकशीत रामसिंगच्या फोनमधून देशहितासंबंधी अनेक महत्त्वाची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाल्याचे समोर आले. तपासादरम्यान, त्याच्या फोनमध्ये सीमेपलीकडे पाठवलेली भारतीय लष्करांच्या अनेक पत्रांची छायाचित्रे सापडली. अद्याप गुप्तचर संस्थेकडून राम सिंगचा तपास सुरू असल्याचे सुत्रांनुसार कळले आहे.

Comments
Add Comment

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत

'वन्यजीव संरक्षण अधिनियमात सुधारणा करा'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे.

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे