मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील सभा प्रत्यक्षपणे घ्या ही मागणी भाजप सातत्याने करत आहे, असे असताना सत्ताधारी शिवसेना मात्र प्रत्यक्ष बैठकीपासून पळ काढत असल्याचा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.
मुंबईतील अनेक निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लोकल प्रवासाला ही मुभा दिल्यानंतर पालिकेतील सभा प्रत्यक्ष का नको म्हणून भाजपने सातत्याने सत्ताधारी पक्षाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापही प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात झाली नाही. यापूर्वी देखील याच मागणीसाठी भाजप सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्षांकडे आंदोलन केले होते. असे असताना देखील भाजप सदस्यांना बुधवारी बैठकीत बसू दिले नाही.
दरम्यान या मागणीसाठी भाजपने उच्च न्यायालयात देखील याचिका केली होती. यात सभा प्रत्यक्ष घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही सत्ताधारी न्यायालयाचा अवमान करत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे तो उघड होऊ नये म्हणून सत्ताधारी प्रत्यक्ष बैठकीपासून पळ काढत आहे का? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
कोरोना काळात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यास सुरुवात झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा करता येत नसून विरोधकांना ऐकू देखील येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष बैठका घ्या ही मागणी भाजपने केली होती. तर स्थायी समितीने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याचेही शिंदे म्हणाले.
पालिकेतील सभा प्रत्यक्ष घेतल्या जाव्यात, या मताचे आम्ही देखील आहोत. त्यासाठी सरकारला तसे पत्र देखील लिहिले आहे. मात्र सरकारने तूर्त तरी पालिकेच्या सभा प्रत्यक्ष न घेता व्हिसीद्वारे घ्याव्यात, असे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसारच सभा घेण्यात येत आहे. – यशवंत जाधव, स्थायी समिती
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…