कापणीची वेळ अन् पावसाचा खेळ...







संजय नेवे


विक्रमगड : तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास वारा व विजेच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून परतीच्या पावसाने शेतात कापलेल्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


सध्या विक्रमगड तालुक्यातील शीळ, ओंदे, आपटी, झडपोली, केव, म्हसरोळी, मलवाडा, दादडे, साखरे, कऱ्हे-तलावली, तलवाडा व विविध भागांतील भातशेती कापणीसाठी तयार झाली असून भात कापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतामध्ये ठेवले आहे. दिवाळीपूर्वी पिवळे सोने घरच्या अंगणात किंवा खळ्यावर नेऊन ठेवण्याचे स्वप्न बळीराजाने बघितले होते. मात्र, अचानक आलेल्या परतीच्या पावसाने कापलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापलेले पीक वाचवण्यासाठी शेतकरी राजाची धावपळ उडाली होती. परतीच्या पावसाने शेतकरी रडकुंडीला आले आहेत.


या पावसाने तालुक्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हा पावसाने हिरावून घेतला आहे. परतीचा पाऊस आणखी दोन ते तीन दिवसांत थांबला नाही तर कापलेले भातपीक खराब होऊन वर्षभराची मेहनत पाण्यात जाण्याची चिन्हे असल्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.


या वर्षी परतीच्या पावसाने विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. माझ्या शेतातील कापणीसाठी तयार झालेल्या भातपीक खाली पडल्याने भातपिकांची धूळधाण झाली आहे.वर्षभराच्या उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. - प्रमोद विश्वनाथ पाटील, शेतकरी, आपटी

Comments
Add Comment

Mumbai BJP President MLA Amit Satam : बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाणार – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

बीएमसी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविण्यासाठी ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित केला जाणार;

Middle East War : युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १७ टक्क्यांची घसरण

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी

Bmc News : मुंबईत ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा

महापालिकेत ठरावाच्या सूचनेद्वारे झाली मागणी मुंबई : शहरात झपाट्याने वाढणाऱ्या ई-कचऱ्याच्या समस्येवर तोडगा

Ashwini Bhide : रस्ते सिमेंटीकरण कामांना कोणतीही मुदतवाढ नाही

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या

BMC News : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांच्या दुरुस्ती खर्चात ७५ टक्के घट

तब्बल २०२ कोटींवरुन खर्च आता अंदाजे ४४ कोटींवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या