Sunday, May 5, 2024
Homeमहत्वाची बातमीनाशिकमध्ये गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना, गोदावरी नदीत २ जण बुडाले

नाशिकमध्ये गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना, गोदावरी नदीत २ जण बुडाले

नाशिक: राज्यात सगळीकडेच गणपती विसर्जनाचा(ganpati visarjan) उत्साह पाहायला आहे. मात्र त्यातच नाशिकमध्ये या सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. गणपती विसर्जन करताना दोन जण बुडाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहहे. नाशिकच्या गोदावरी नदीत विसर्जनासाठी गेलेले नदीच्या पाण्यात बुडाले. अखेरच्या दिवशी नाशिकमध्ये या गणपती उत्साहाला गालबोट लागले.

नाशिकच्या गोदावरी नदीत दोघे जण बुडाले तर वालदेवी धरणात तीन जण बुडाले. या धरणात बुडालेल्या व्यक्तींपैकी दोन महाविद्यालयीन तरूण तर एक विवाहित तरूणाचा समावेश आहे. गणपती विसर्जन करताना बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनही युद्ध पातळीवर सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात गोदावरील नदीत बुडालेल्या तरुणांबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. तर वालदेवी धरणात विसर्जन करताना तीन जण बुडाले. या सर्व बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

रायगडमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट

गणपती विसर्जनासाठी गेलेले ४ जण उल्हास नदीत बुडाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रायगडमध्ये कर्जत येथे उल्हास नदीत चार गणेशभक्त विसर्जनाला गेले होते. यावेळेस पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे चारजण वाहून गेले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -