Thursday, May 2, 2024
Homeरविवार विशेषफेसबुकच्या माध्यमातून व्यवसायांना प्रोत्साहन: नीलम उमराणी-एदलाबदकर

फेसबुकच्या माध्यमातून व्यवसायांना प्रोत्साहन: नीलम उमराणी-एदलाबदकर

  • दी लेडी बॉस : अर्चना सोंडे

घे भरारी उद्योगाची
तू जिद्द ठेव मनाशी,
फक्त करून दाखविण्याची,
घे उंच भरारी, तू घे उंच भरारी…….

माजात अनेक स्त्रिया विविध प्रकारची आव्हाने पेलतात. नोकरी, व्यवसाय, घर, मूल आणि घरातल्या वयस्करांच्या जबाबदाऱ्या पेलून मनात कुठेतरी काहीतरी बनण्याची त्यांची ऊर्मी आपल्याला ठिकठिकाणी पहायला मिळते. कधी परिस्थिती त्यांना व्यवसाय करून पोटाची खळगी भरायला शिकवते, तर कधी स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये असते. या सगळ्य़ांत कित्येक स्त्रियांना बाहेरच्या जगात अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा वेळी या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी मदतीचा हात घेऊन पुढे उभी असते ती ‘घे भरारी’.

२०२० साली संपूर्ण जग हे कोरोना या जागतिक महारोगासोबत लढत होते. कोरोनामुळे न केवळ माणसाच्या आरोग्यावर परिणाम झाला, तर त्याच्या व्यवसायावरही गदा आली. हे लक्षात घेऊन १ मे २०२० साली नीलम उमराणी-एदलाबदकर यांनी ‘घे भरारी’ या फेसबुक ऑनलाइन ग्रुपची निर्मिती केली.
नीलम यांनी अनेक वर्षे इयत्ता ९वी आणि १०वीसाठी विज्ञान आणि गणिताच्या शिक्षिका म्हणून अध्यापनाचे काम केले. नीलम यांची अपत्ये खूपच लहान असल्यामुळे त्यांना शिक्षकी पेशामधून ब्रेक घ्यावा लागला. काही वर्षांमध्ये त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली. यावेळी त्यांना इतरांसाठी काम करायचे होते. इतरांचे जीवन उज्ज्वल करण्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आणि त्यावेळी नीलम यांनी ‘घे भरारी’ची सुरुवात केली. ज्यामध्ये त्यांनी घरगुती ते छोटेखानी उद्योगांना प्रोत्साहन देऊ केले. तसेच लहान स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी फेसबुक ग्रुप तयार केला. तसेच त्यांचा एक मिश्र गट आहे, ज्यात ७० टक्के स्त्रिया आणि बाकीचे पुरुष आहेत. यामध्ये अनेक तरुण उद्योजक आहेत, ज्यांच्याकडे असाधारण कल्पना आहेत व त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्या ब्रँडचा प्रचार करण्यास मदत करत आहोत. घे भरारी त्यांना त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग, मार्केटिंगपासून पॅकेजिंगचे महत्त्व, ग्राहक इ.पर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारची मदत करते.

पूर्वी संस्था एक प्रदर्शन हे वर्षातून एकदा भरवत असे. पण एप्रिल २०२० मध्ये कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे त्यांना प्रदर्शन रद्द करावे लागले. त्यावेळी अनेक स्टॉलधारक खूप माल मागवून ठेवला होता लाखो रुपयाची गुंतवणूक केली होती. स्टॉलधारकांना यामुळे खूप निराशा आली. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी ‘घे भरारी ऑनलाइन प्लॅटफॉर्म’ची निर्मिती झाली. जेव्हा हे सुरू केले, तेव्हा लोकांना कोविडमुळे झालेले नुकसान कमी झळ बसून सोसता यावे हा हेतू होता. पण इतक्या छोट्या रोपट्याचं आज मोठ्या वटवृक्षांत रूपांतर झालंय.

१ मे २०२ ला अशाच निराश व्यवसायिकांना एकत्र जमवून केलेल्या फेसबुक व्यावसायिक ग्रुपमध्ये आता अवघ्या दीड वर्षात १,८५,००० लोक आहेत. आणि रोज त्यांची संख्या वाढतेच आहे. आता निराशा संपून सर्व व्यावसायिक आनंदाने व्यवसाय करत आहेत. खाद्यपदार्थ, दागिने, कपडे इत्यादी जे म्हणाल ते इथे उपलब्ध आहे.

हा ग्रुप चालवताना महत्त्वाचं आव्हान हे खूप म्हणजे ग्रुप हा नेहमी सक्रिय ठेवणे. यासाठी ग्रुपमध्ये सतत सकारात्मक वातावरण निर्मिती केली. त्यासाठी वेगवेगळ्या कल्पना व उपक्रम राबवले. तसेच एफबी Live च्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठ्या लोकांना बोलावून त्यांचा सकारात्मक प्रवास लोकांपर्यंत पोहोचवला. लोकांच्या गरजेनुसार त्यांच्या सुविधा पुरवणाऱ्या व्यावसायिकांशी जोडले. कोरोना काळात आजारी व्यक्तींना घरपोच डबा सुविधा पुरवल्या, त्यांना लागणारे उपचार व इतर सुविधा ‘घे भरारी’ यांच्या माध्यमातून पुरवण्यात आल्या, हे घे भरारीचे सर्वात मोठे यश आहे.

सध्या ‘घे भरारी’मध्ये विविध प्रकारचे उत्पादन आहेत. जसे की- दागिने, खाद्यपदार्थ, कपडे, घर सजावट उत्पादने इ. ग्राहक वस्तू आहेत. तसेच वेगवेगळे सेवा क्षेत्र आणि घरगुती उद्योग असणारी स्त्रियांचाही समावेश आहे. अनेक कुरिअर व्यवसायही यात असून तेही समान घरपोच देण्यास याच ग्रुपमध्ये तत्पर असतात. मार्केटिंग, ब्रँडिंग, कन्टेन्ट लिहून देणारे असे सर्व लोक एकमेकांना मदत करताना इथे दिसतात. पैशाची गुंतवणूक, मोठे बिल्डर, इस्टेट एजंट हेदेखील ग्रुपमधून व्यवसाय करत आहेत. यापुढे संस्थेची वाटचाल यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रसह संपूर्ण भारतभर प्रदर्शन करणे आहे व त्याचबरोबर खेडे गावातील स्त्रीला सुद्धा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यवसाय मिळावा.

येथे कोणी कोणाचे बॉस नाही. नीलम म्हणतात की, ‘त्यांना तळागाळातील व्यक्तीपासून काम करायला आवडेल… सर्वांचा व्यवसाय वाढावा, नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे निर्माण करायचे असतील, तर झटून काम केले पाहिजे.’

प्रत्येकासाठी काम करणे आणि प्रत्येकाला सोबत घेऊन चालणे हे ज्याला जमले, तेच तर खरे नेतृत्व. लेडी बॉस व्हायचं असेल तर सगळ्या महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मग ती श्रीमंत असो व गरीब, किंवा खेड्यातील असो व शहरातील… प्रत्येकाच्या गरजेला धावून जाईल ती खरी लेडी बॉस असते यावर नीलम यांचा गाढ विश्वास आहे.

theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -