लंडन (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा (T-20 World Cup) नवीन फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत २० संघ सहभागी होणार आहेत. आयसीसी आणि जगातील क्रिकेटच्या प्रशासकीय संस्थेने या स्पर्धेचे स्वरूप बदलले आहे. २०२४ मध्ये ही स्पर्धा होणार आहे.

आगामी विश्वचषकात २० संघ सहभागी होणार आहेत. आतापर्यंत १६ संघ विश्वचषक खेळायचे. यापैकी ८ संघांनी थेट सुपर लीग फेरीत प्रवेश केला होता. उर्वरित ४ संघ पहिल्या फेरीतून पात्र ठरले होते. आता २० संघांची चार गटांत विभागणी करण्यात येणार आहे. म्हणजे प्रत्येक गटात ५ संघ असतील. प्रत्येक गटातील टॉप-२ संघ सुपर-८ फेरीत प्रवेश करतील. हे आठ संघ दोन सुपर लीग विभागात विभागले जातील. प्रत्येक विभागात चार संघ असतील. हे सर्व संघ आपापसात तीन साखळी सामने खेळतील. येथून प्रत्येक विभागातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीत जातील आणि उपांत्य फेरीत विजयी होणारा संघ अंतिम फेरीत खेळेल.

Bronze medal : रायगड पोलीस दलातील दोघांना कांस्य पदक

आतापर्यंत १२ संघ या स्पर्धेकरिता पात्र ठरले आहेत. यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकातील टॉप-८ चे संघ थेट पात्र ठरले आहेत. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला यजमान म्हणून थेट प्रवेश मिळाला. याशिवाय आणखी दोन संघ क्रमवारीच्या आधारावर आले आहेत. उर्वरित ८ संघ क्वालिफायर स्पर्धेत उतरतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here