Thursday, March 28, 2024
Homeमनोरंजन‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन २५ सप्टेंबरपासून

‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन २५ सप्टेंबरपासून

महेश मांजरेकर करणार होस्ट; सांगितले राग शांत करण्याचे १०१ उपाय

दीपक परब

‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक चाहते या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘बिग बॉस’ मराठी हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. चौथ्या सीझनचे दोन प्रोमो आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे हा सीझन कधी सुरू होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. २५ सप्टेंबरपासून हा कार्यक्रम सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो आऊट झाला आहे. बिग बॉस मराठीचे तिन्ही सीझन महेश मांजरेकरांनी चांगलेच गाजवले आहेत. त्यांची बोलण्याची आणि स्पर्धकांची शाळा घेण्याची शैली प्रेक्षकांना विशेष आवडली. या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर हे राग शांत करण्याच्या १०१ उपायांविषयी बोलत आहेत. मांजरेकर म्हणत आहेत, ‘यावेळी विचार करतोय शांतपणे होस्ट करायचे. चिडचिड करायची नाही.’ असे म्हणताना मांजरेकर मात्र हसताना दिसत आहेत. त्यामुळे मांजरेकर आता चावडीवर स्पर्धकांची शाळा शांतपणे घेणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

बिग बॉस मराठीचे तिन्ही सीझन महेश मांजरेकरांनी चांगलेच गाजवलेत. त्यांची बोलण्याची आणि स्पर्धकांची शाळा घेण्याची शैली प्रेक्षकांना विशेष आवडली. पण आता नव्या सीझनमध्ये मांजरेकर वेगळी शाळा घेणार असल्याने प्रेक्षक ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन २५ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

कलाकारांमध्ये अनिता दाते, किरण माने, अभिजीत आमकर, रुचिता जाधव, शुभांगी गोखले, निखिल चव्हाण, मृणाल दुसानीस, अक्षय केळकर यांची नावे सामील आहेत. मात्र, वाहिनीकडून अद्याप यावर कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही.

‘सूर नवा ध्यास नवा’ अंतिम टप्प्यात

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २४ सप्टेंबरला या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडू शकतो. त्यामुळे २५ सप्टेंबरपासून ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या सीझनला सुरुवात होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘ज्ञानेश्वर माऊली’ मालिकेत उत्कर्ष शिंदे साकारणार संत चोखामेळा

ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माऊली आणि त्यांची भावंडे यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावल्या आहेत. आता या मालिकेत उत्कर्ष शिंदे संत चोखामेळांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

अलौकिक हरिभक्तीच्या प्रवासाचे प्रेक्षक साक्षीदार झाले आहेत. ‘ज्ञानेश्वर माऊली’ मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. माऊली, त्यांची भावंडे, इतकंच नव्हे तर मालिकेत माऊलींच्या कार्याला विरोध करणारे विसोबा या व्यक्तिरेखांवरही प्रेक्षकांनी प्रेम केले. पण, आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना, यात आणखी एका संताची एन्ट्री होणार आहे.

मालिकेतील संतांच्या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झाली आहे. माऊलींच्या चमत्काराबरोबरच संतांच्या चमत्कारांची पर्वणीही प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करत आहे. ‘संत चोखामेळा’ या पात्राची मालिकेत एन्ट्री होणार असून या भूमिकेत उत्कर्ष शिंदे झळकणार आहे. पतितांना तारणारे व उपेक्षितांची कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणून संत चोखामेळा यांच्याकडे पाहिले जाते. या भूमिकेतून छोट्या पडद्यावर उत्कर्षला पाहणे प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे. अंगावर घोंगडीचे शिवलेले वस्त्र, हातात काठी अशा मोहक रूपात उत्कर्ष असेल. त्याच्या या लूकची प्रेक्षकांमध्ये नक्कीच चर्चा होईल, यांत शंकाच नाही. त्याच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. विठ्ठलाचा निस्सीम भक्त असलेला चोखामेळा आणि ज्ञानेश्वर माऊली यांचे संबंध नेमके कसे होते, हे पाहणे प्रेक्षकांना उत्सुकतेचे ठरेल.

संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘संत चोखामेळा’ यांचा प्रवास प्रेक्षकांना ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -