इटावा : लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. याच दरम्यान पोलिसांनी एका तरुणाला अजब शिक्षा दिली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील इटावा पोलीस ठाण्यात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. लॉकडाऊनचं उल्लंघन करणा-या व्यक्तीला सपना चौधरीच्या गाण्यावर पोलीस ठाण्यात डान्स करायला लावला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र नियम मोडणा-याला अजब शिक्षा देणे पोलिसांच्याच अंगलट आल्याची माहिती मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर येथील अधिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे.