डहाणू (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील डहाणू भूकंपाच्या (Earthquake) धक्क्यांनी हादरले असून बुधवारी डहाणूला भूकंपाचा धक्का जाणवला. या धक्काची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या तीन दिवसांत पुन्हा भूकंपाचे धक्के सुरू असून, सोमवारी पहाटे, मंगळवारी सकाळी ६ वाजता तर बुधवारी चार वाजून चार मिनिटाला भूकंपाचा धक्का जाणवला. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा भूकंपाचे धक्के बसू लागल्याने पुन्हा येथिल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डहाणू, तलासरी, बोर्डी, कासा, चारोटी, उर्से या जवळपास २५ ते ३० किलोमीटर परिसरात हा धक्का जाणवत आहेत.

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरीमध्ये सध्या भूकंपाचे धक्के पुन्हा सुरू असून मध्यंतरी भूकंपाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता; मात्र आता डहाणू तलासरी भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाचे केंद्र असलेल्या धुंदलवाडी पासून आजूबाजूच्या २० ते २५ किलोमीटर च्या परिघात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

सुरुवातीपासून आतापर्यंत २.५ ते ३.९ महत्तेचे (रिश्टर स्केल) धक्क्यांची नोंद असून काहीवेळा हे धक्के मोठ्या प्रमाणात बसत असून अनेक घरांच्या भिंतीना तडा जात आहेत. कालांतराने ती घरे कोसळताहेत. भूकंपामुळे घरांचे नुकसान झाले असून अनेकांना शासनाकडून मदत ही मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here