Friday, April 19, 2024
Homeसाप्ताहिकमजेत मस्त तंदुरुस्तसावधान! जादा झोप आरोग्यासाठी हानिकारक? होतात 'हे' गंभीर आजार!

सावधान! जादा झोप आरोग्यासाठी हानिकारक? होतात ‘हे’ गंभीर आजार!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वांना झोपेची आवड असते आणि बहुतेक वेळा फायदे लक्षात घेऊन अतिरिक्त वेळ झोपायलाही आवडते. कधी कधी हे करणे चांगले असते. कारण स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी आपलीच असते; परंतु अतिरिक्त तास झोपणे ही तुमची सवय आणि गरज बनते, तेव्हा समस्या उद्भवू शकते. कारण जितकी कमी झोप घेणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, तितकंच जास्त झोपल्यानेही शरीरावर वाईट परिणाम होतो.

१८ ते ५८ वर्षे वयोगटातल्यांनी सात-आठ तास झोपणे आवश्यक मानले जाते; परंतु यापेक्षा कमी वयोगटातल्यांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी झोपेचे तास ९ ते ११ पर्यंत असू शकतात; पण एखादी तरुण व्यक्ती रोज नऊ ते ११ तास झोपू लागते, तेव्हा ती चिंतेची बाब बनते. याचा अर्थ शरीरात आरोग्याबाबत काही समस्या असू शकतात. अशा वेळी शरीरात पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येत असेल किंवा ‘हायपरसोम्निया’ची समस्या असू शकते. ‘हायपरसोम्निया’मध्ये एखाद्या व्यक्तीला सतत झोप येते. ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती इच्छा असूनही जागृत राहू शकत नाही. त्याला सतत झोप येत राहते आणि इतकी झोप येते की सतत मादक वाटू लागते. ‘हायपरसोम्निया’ मध्ये, २४ पैकी दहा तास झोपल्यानंतरही एखाद्या व्यक्तीला झोप येत राहते. म्हणजेच दहा तास झोपूनही झोप पूर्ण होत नाही असे वाटते. या समस्येने ग्रस्त व्यक्ती दिवसातल्या २४ तासांपैकी १६ तास झोपू शकते. ही स्थिती काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यंत टिकू शकते. त्यामुळे, जास्त झोप येत असल्याचे स्पष्ट होताच ताबडतोब डॉक्टरांकडे तपासणीसाठी जावे, असे सांगितले जाते.

‘हायपरसोम्निया’वर उपचार करण्यासाठी सामान्यतः वापरली जाणारी औषधे, रोगाच्या मूळ कारणावर कार्य करण्याऐवजी, सहसा इतर समस्या निर्माण करतात. कारण ही औषधे खूप उत्तेजक मानली जातात. ही औषधे रोग पूर्णपणे बरा करण्यासाठी वापरली गेल्यास ‘नार्कोलेप्सी’चे कारण बनतात. हा एक प्रकारचा झोपेशी संबंधित आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या मेंदूचे झोपेच्या चक्रावरील नियंत्रण सुटते. अशा परिस्थितीत चांगल्या डॉक्टरांकडे उपचार घ्यावेत. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. झोपण्यासाठी बेड स्वच्छ आणि खोलीचे वातावरण अनुकूल ठेवावे. चहा-कॉफीचे सेवन कमी करावे. अशा वेळी मद्यपानापासून दूर राहणंही महत्त्वाचे ठरते. आयुर्वेदिक औषधे त्रुटींवर नैसर्गिकरित्या मात करतात आणि त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -