गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास मिळतो ५० लाखांचा विमा (Insurance)

घरगुती गॅस कनेक्शनसोबत मिळतो ५० लाखांचा विमा (Insurance)

मुंबई : भारतात साधारण सर्वच घरात गॅस सिलिंडरचे कनेक्शन आहे. मात्र कित्येक जणांना गॅस सिलिंडरशी संबंधित ग्राहकांना त्यांच्या अधिकारांबाबत पुरेशी माहिती नसते. परंतु गॅस डिलरने ग्राहकांच्या गॅस कनेक्शनशी संबंधित अधिकारांबद्दल माहिती दिली पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. याकरता ग्राहकांनी स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक असले पाहिजे.

जे ग्राहक एलपीजी गॅस कनेक्शन घेतात, त्यांना ५० लाख रूपयांपर्यंतचा विमा (Insurance) असतो. या पॉलिसीला एलपीजी इन्शुरन्स कव्हर असे म्हटले जाते. गॅस सिलिंडरमुळे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अपघातात जीवित आणि मालमत्तेच्या हमीसाठी हा विमा दिला जातो. ग्राहकांना गॅस कनेक्शन मिळताच ग्राहक पॉलिसीसाठी पात्र ठरतात. त्यामुळे ग्राहकांना हे कनेक्शन मिळताच ग्राहकाला हा विमा लागू होतो.

गॅस सिलिंडर खरेदी करताना ग्राहकाचा एलपीजी विमा तयार केला जातो. हा विमा सिलिंडर एक्सपायरी डे शी जोडलेला असतो. त्यामुळे ग्राहकाला गॅसवरील एक्सपायरी डेट पाहूनच सिलिंडर घ्यावा लागणार आहे. गॅस कनेक्शन घेताच ग्राहकाला ४० लाख रुपयांचा अपघाती विमा देण्यात येतो. तसेच सिलिंडरच्या स्फोटामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांपर्यंतचा दावा केला जाऊ शकतो. यासाठी ग्राहकाला कोणताही अतिरिक्त मासिक प्रीमियम शुल्क भरावी लागत नाही.

ग्राहकाने अपघात झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत त्याच्या वितरक आणि जवळच्या पोलीस स्टेशनला अपघाताची तक्रार द्यावी. अपघाताच्या एफआयआरची प्रत पोलिसांकडून घेणे आवश्यक आहे. दाव्यासाठी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या प्रतसोबतच वैद्यकीय पावती, रुग्णालयाचे बिल, शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यूचे प्रमाणपत्रही आवश्यक आहे.

कंपन्या उचलतात अपघाताचा खर्च LPG Insurance Policy

ज्या व्यक्तीच्या नावावर सिलिंडर आहे, त्यालाच विम्याची रक्कम मिळते. या पॉलिसीमध्ये ग्राहक कोणालाही नॉमिनी बनवू शकत नाही. क्लेमचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळेल, ज्यांचे सिलिंडरचे पाईप, स्टोव्ह आणि रेग्युलेटर आयएसआय मार्कचे आहेत. क्लेमसाठी, ग्राहकांनी सिलिंडर आणि स्टोव्हची नियमित तपासणी केली पाहिजे. गॅस वितरक तेल कंपनी आणि विमा कंपनीला अपघाताची माहिती देतो. इंडियन ऑइल, एचपीसीएल, बीपीसीएल यासारख्या तेल कंपन्या सिलिंडरमुळे अपघात झाल्यास विम्याचा संपूर्ण खर्च उचलतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here