‘ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्राला वेगळा नियम का?’

Share

मुंबई (प्रतिनिधी) : एक तर निवडणुका पूर्णपणे घ्या किंवा पूर्णपणे थांबवा, अशी मागणी घेऊन राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ओबीसी आरक्षणावरून देशातील इतर राज्यांना वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा नियम का? असा सवाल उपस्थित करत ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात किंवा सर्वच निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी राज्याचे अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या २७ टक्के जागांवरील निवडणुकीला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद हस्तक्षेप याचिकेद्वारे आव्हान देणार असल्याची माहिती देखील छगन भुजबळ यांनी दिली. या प्रकरणी १३ तारखेस सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षणासाठी लागणारा इम्पेरिकल डेटा राज्य मागताहेत, तर का दिला जात नाही? उज्ज्वला योजना वगैरे योजनांसाठी हा डेटा चालतो, मग राज्यांना का देत नाही? असा सवालही यावेळी भुजबळ यांनी उपस्थित केला.

Recent Posts

Archery World Cup : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुष आणि महिला संघाला सुवर्णपदक

शांघाय : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत (Archery World Cup 2024) भारतीय पुरुष आणि महिला संघांनी भारताच्या…

29 mins ago

Buldhana Bus Accident : बुलढाण्यात भीषण अपघात; १०० फूट खोल दरीत कोसळली बस!

२८ प्रवासी जखमी बुलढाणा : देशभरात अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना अशातच बुलढाण्यामधून भीषण…

40 mins ago

Mumbai Congress : मुंबईत काँग्रेसला धक्का! बड्या नेत्याने दिला स्टार प्रचारकपदाचा राजीनामा

वर्षा गायकवाड यांना दिलेल्या उमेदवारीमुळे नाराजी मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मुंबईत काँग्रेसला (Congress)…

1 hour ago

Water Supply : मुंबईकरांवर पाणीबाणी! ‘या’ दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद

'पाणी जपून वापरा' असे आवाहन मुंबई : सध्या अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलण्याचे काम…

1 hour ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २७ एप्रिल २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया ०८.२० नंतर चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग…

7 hours ago

उबाठा सेनेचा भंपक निवडणूक जाहीरनामा

देशामध्ये सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहत असून जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रत्येक राजकीय…

10 hours ago