Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीWhatsapp new feature : व्हॉट्सअ‍ॅपचा युनिकनेस हरवणार? व्हॉट्सअ‍ॅप नवे फीचर आणण्याच्या तयारीत...

Whatsapp new feature : व्हॉट्सअ‍ॅपचा युनिकनेस हरवणार? व्हॉट्सअ‍ॅप नवे फीचर आणण्याच्या तयारीत…

मुंबई : जगभरात जवळजवळ एका अब्जाहून अधिक युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) हे सोशल मीडिया अ‍ॅप (Social Media app) नवनवीन प्रयोग करत असतं. व्हॉट्सअ‍ॅपच्या अगदी सुरुवातीच्या काळात केवळ ते एकच अ‍ॅप सोयीचं असल्याने खूपच लोकप्रिय होतं. प्रत्येकाच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप गरजेचं बनलं होतं. आजही काही माहिती अथवा फोटो पाठवायचा झाल्यास आपण ‘व्हॉट्सअ‍ॅप करतो तुला’ असं सहज म्हणून जातो, इतकी या अ‍ॅपची लोकप्रियता आहे.

पण हल्लीच्या काळात अनेक सोशल मीडिया अ‍ॅप्स आले आहेत, ज्यावरुन संपर्क क्रमांकाशिवाय सहज संपर्क साधणे शक्य झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधायचा असेल तर त्याचा संपर्क क्रमांक गरजेचा असतो, मात्र इतर अ‍ॅप्स क्रमांकाशिवाय या सुविधा पुरवतात. त्यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅपही या स्पर्धेत टिकण्यासाठी नवनवीन फीचर्स आणत आहे.

अधिक सुरक्षितता आणि गोपनीयता बाळगण्यासाठी आता व्हॉट्सअ‍ॅप युजरनेमचे (Username) फीचर आणणार आहे. ज्यामुळे संपर्क क्रमांकाची (Contact Number) गरज भासणार नाही. याद्वारे यूजर्सच्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन सर्च बार उपलब्ध होईल ज्याद्वारे ते मोबाईल नंबरशिवाय त्यांच्या यूजरनेमद्वारे इतर लोकांना शोधू शकतील. त्यामुळे लोकांना लवकरच व्हॉट्सॲपवर नवीन युजरनेम आयडी मिळणार आहे. या फिचरवर सध्या काम सुरु आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने आतापर्यंत अनेक प्रयोग करुन पाहिले, पण त्याचे जुने व्हर्जन युजर्सना आवडत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने स्टेटस ठेवण्याची पद्धत इन्स्टाग्रामच्या स्टोरीजप्रमाणे केली तीही युजर्सना फारशी रुचली नाही. त्यामुळे आता इतर अ‍ॅप्सप्रमाणे युजरनेम वापरुन संपर्क केल्याने व्हॉट्सअ‍ॅपचा युनिकनेस (Uniqueness) हरवेल, अशी चर्चा होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -