Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, दि. २५ जून ते १ जुलै २०२३

Share

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, दि. २५ जून ते १ जुलै २०२३

वाद-विवाद मिटतील
मेष – भागीदारी व्यवसायांमध्ये काही वाद-विवाद असतील, तर ते संपवण्याची वेळ आहे. कामांमध्ये नीट लक्ष देऊन शांतरीतीने आपले काम करावे. या कालावधीमध्ये जास्तीत जास्त मेहनत व चांगल्या रीतीने काम करण्याचा प्रयत्न करणार आहात. आपणास मित्रांचा सहयोग मिळणार आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात पैशाच्या देवाण-घेवाणीचा व्यवहार करताना सतर्क असावे. फसवणुकीचे व्यवहार होऊ शकतात. राजनीतीतील व्यक्तीने भाषा संयमी ठेवावी. या कालावधीमध्ये आपले वाहन कोणालाही देऊ नका. कोणाचेही वाहन आपण वापरू नका.
व्यवसायामध्ये वृद्धी
वृषभ – वडिलांचे आपणास पूर्ण सहकार्य लाभणार आहे. ज्या व्यक्ती व्यापार-व्यवसायात आहेत, त्यांना वडिलांकडून आर्थिक मदत मिळू शकते. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये आपणास जर गुंतवणूक करण्याची इच्छा असेल, तर विचारपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. एखाद्या मोठ्या कंपनीकडून आपणास चांगल्यापैकी ऑर्डर मिळणार आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहात. आपले प्रयत्न चांगल्या रीतीने यशस्वी होणार आहेत. आर्थिक फायदे होणार आहेत. व्यापार- व्यवसायामध्ये वृद्धी होणार आहे. उधारी वसूल होईल.
आत्मविश्वास चांगला
मिथुन – आपला आत्मविश्वास चांगला असणार आहे. आपली एनर्जी लेव्हल पण उच्चप्रतीची असणार आहे. ज्या व्यक्तींचा व्यवसाय पारंपरिक आहे हे त्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये आपणास मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. आपण खूप सतर्क राहून काम करा. या कालावधीमध्ये आपण अतिशय कामामध्ये व्यस्त असणार आहात त्यामुळे घरात व मुलांकडे कमी लक्ष दिले जाऊ शकते. मुलांच्या विद्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यामध्ये जातीने लक्ष घाला.
अनुकूल कालावधी
कर्क –
आपले इनकमपेक्षा खर्च खूप जास्त होणार आहे. तरी ती एक प्रकारची गुंतवणूक आहे असे म्हणू शकतो. पुढे जाऊन त्याचा फायदा होणार आहे. जे नवीन नोकरी शोधत आहेत, त्यांना चांगल्यापैकी नोकरी मिळणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंद असेल आणि गोडवा असणार आहे. प्रेमी-प्रेमिकासाठी हा अनुकूल काळ आहे. हा कालावधी आपणासाठी अतिशय अनुकूल आहे. क्रीडा क्षेत्र यामधील व्यक्तींना लोक आश्चर्यचकित होतील, असे यश मिळणार आहे. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी येणार आहेत. संधीचे सोने करा. महिलांना हा कालावधी आनंदाचा असणार आहे.
अडचणींवर मात
सिंह – आपल्याला व्यापार व्यवसायमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या, त्यामध्ये आपणास मार्ग सापडणार आहे. जे जातक नोकरी शोधत होते त्यांना नोकरी मिळणार आहे. आपले रचनात्मक कार्यकौशल्यामुळे आपले वरिष्ठ खूश होणार आहेत. ज्या व्यक्तींना सुट्टीची आवश्यकता आहे त्यांना सुट्टी मिळणार नाही, असे वातावरण होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये आपणाला नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहेत. सप्ताहाच्या शेवटी हितशत्रू तोंड वर काढण्याची शक्यता आहे, सांभाळून राहणे.
अपेक्षित यश
कन्या –
राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येणार आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी केलेले प्रयत्न सफल होतील. भागीदारीच्या व्यवसायामध्ये पारदर्शकता असणे फार आवश्यक आहे. खोट्या व चुकीच्या गोष्टींना अजिबात स्थान देऊ नका. हिशोबातील गडबडीमुळे आपणाला खूप त्रास होऊ शकतो. अचानक प्रकृती बिघडून पुढचा कार्यक्रम बिघडण्याची शक्यता आहे. अचानक घरच्या व्यक्तींच्या वागणं बदलल्यामुळे आपण चिंतीत असाल. गर्दीतून वाहन नीट चालवा. सर्वच बाबतीत सतर्क राहणे चांगले.
नोकरी मिळणार आहे
तूळ – व्यापार-व्यावसायिकांच्या व्यापारात यात वाढ होणार आहे. पैसे मिळवण्याचे नवीन नवीन मार्ग मिळणार आहेत. आपणाला जर गुंतवणूक करायची असल्यास ती स्थिर मालमत्तेत करू शकता. बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये आपल्या जोडीदाराच्या मनात कुठले तरी भय उत्पन्न होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये सर्व चांगले असूनही मनामध्ये गोंधळ असण्याची शक्यता आहे. प्रकृती स्वास्थ्याला जपणे आवश्यक आहे.
निर्णय योग्य ठरतील
वृश्चिक – आपणास अनुकूल कालावधी असणार आहे. परदेशांमध्ये प्रवास करण्याचा आपला विचार असेल, त्यासाठी आपण प्रयत्न करत असाल, तर त्यासाठी हा कालावधी अतिशय चांगला आहे. याचा आपण फायदा घ्या. लांब नोकरी करत असाल, तर आपल्या इच्छेनुसार आपली बदली होऊ शकते. व्यापार-व्यवसाय असेल, तर अनेक ठिकाणी प्रवास करावा लागणार आहे, त्यामुळे व्यावसायिक संबंध चांगले होणार आहेत. कार्यक्षेत्रात आपण रचनात्मक ठोस काही करणार असाल, तर आपणासाठी हा कालावधी चांगला आहे. आर्थिक दृष्ट्या चांगला काळ. आपले निर्णय योग्य ठरतील.
कार्यक्षेत्र वाढेल
धनु – आपल्या बहीण-भावाविषयी आपले संबंध मधुर होणार आहेत. आपण जर व्यापार व्यवसाय करत असाल, तर आपल्या वडिलांचे सहाय्य आपणास मिळणार आहे. आपला देवावर विश्वास बसण्याची शक्यता आहे. अध्यात्मामध्ये आपणास गोडी निर्माण होणार आहे. एखाद्या धार्मिक मंगलकार्याचे आयोजन आपल्याकडे होऊ शकते. आपल्या कार्यक्षेत्रात थोड्याफार अडचणी येऊ शकतील, पण त्याची काळजी करण्याची जरूर नाही. आपल्या जोडीदाराचे आपल्याला पूर्ण सहकार्य असणार आहे. व्यापारात चढ-उतार होतील पण फायदे चांगले होतील.
कामाचा फायदा मिळेल
मकर –
आपल्यामधील धैर्याची आणि पराक्रमाची वाढ होणार आहे. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये आपले परिश्रम वाढणार आहेत. जे काम आपण केले आहे, याचा फायदा निश्चित मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील टार्गेट आपण सहज पूर्ण करणार आहात. आपला या कालावधीमध्ये प्रवास होण्याचीही शक्यता आहे. जे विद्यार्थी टेक्निकल साईडला आहेत, त्यांना विशेष येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात किंवा विद्यार्थ्यांनी अभ्यासात अजिबात आळस करू नका. जे पीएच.डी. किंवा संशोधनाचे कार्य करत आहेत, त्यांना चांगले यश मिळेल. प्रवासात नवीन मित्र मिळतील.
आत्मनिरीक्षण करणे आवश्यक
कुंभ –
आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या गुणाने, कार्यकौशल्याने प्रगती समोर दिसून येत आहे. आपल्या जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या तऱ्हेने पार पाडत आहात. पण याच कारणाने शत्रू तोंड वर काढणार आहे. स्पर्धक बलवान होतील. आपल्या कार्यक्षेत्रात आजूबाजूचे लोक यांच्याशी आपण गोडीगुलाबीने राहावे. तसेच आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण आहे. इतरांचे म्हणणे ऐकून घ्या. आपल्या भावनांवर आवर घालणे आवश्यक आहे. तसेच अधिकारी व्यक्तींशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे. आपले आत्मनिरीक्षण करणे आवश्यक आहे.
चांगला फायदा
मीन – आपल्या सहाव्या स्थानाचा अधिपती सूर्य चतुर्थ भावातून गोचर भ्रमण करत आहे. व्यापार व्यवसायिकांना जर व्यवसायासाठी कर्ज हवे असेल तर ते त्यांना मिळणार आहे. नवीन व्यवसायिकांना याचा चांगला फायदा होणार आहे. आपली मालमत्ता विकायची असल्यास, त्यामध्ये सुद्धा आपणास चांगला फायदा मिळणार आहे. आपल्या आई किंवा पत्नीच्या नावाने जर शेअर्स असतील, तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांनी मात्र आपल्या वागण्या-बोलण्यात काळजी घ्या. आपल्या अधिकारी व्यक्तीशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा.

Recent Posts

Sangli Loksabha : सांगलीत मतदान केंद्रावर घडला ‘हा’ वादग्रस्त प्रकार

पोलीस आणि मतदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? सांगली : देशभरात होणाऱ्या लोकसभा…

45 mins ago

Chitra Wagh : तुमचं टायमिंग पाहता यामागे राजकीय हेतू आहे का?

मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या रेणुका शहाणेंना चित्रा वाघ यांचा पत्रातून टोला मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या…

50 mins ago

Vidhan Parishad Election 2024 : लोकसभेनंतर महाराष्ट्रात लगेच होणार विधानपरिषद निवडणूक!

जाणून घ्या कोणत्या जागांवर आणि किती तारखेला होणार मतदान... मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची…

1 hour ago

RBI : आरबीआयची नवी नियमावली; कर्ज वाटपासंदर्भात कडक सूचना जाहीर!

कॅश लोनवर असणार 'हे' नवे नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : नवे आर्थिक वर्ष…

2 hours ago

Shivaji Park Meeting : ठाकरेंना मागे सारत शिवाजी पार्कवर होणार मनसेचीच सभा!

महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी १७ मे रोजी पहिल्यांदा एकत्र मंचावर येणार मुंबई…

2 hours ago

MP Loksabha Election : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ‘या’ चार मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

जाणून घ्या नेमकं कारण काय? मध्य प्रदेश : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु…

2 hours ago