साप्ताहिक राशिभविष्य, १४ जानेवारी ते २० जानेवारी २०२४

Share

साप्ताहिक राशिभविष्य, १४ जानेवारी ते २० जानेवारी २०२४

आर्थिक परिस्थिती मजबूत राहील
मेष :
या आठवड्यात अनुकूल ग्रहमानाचा वरदहस्त लाभल्यामुळे, शुभ ग्रहांची साथ मिळाल्यामुळे हा काळ आनंददायी ठरेल. व्यवसाय-धंद्यातील वातावरण समाधानकारक राहून नोकरीतील परिस्थितीसुद्धा अनुकूल राहील. नोकरीतून काही मनाला आनंद देणाऱ्या वार्ता मिळू शकतात. नव्या घटना घडून त्याचा आपल्याला लाभ मिळू शकतो. एखादी महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल तसेच प्रवासाचे योगही आहेत. परदेशगमनाची शक्यता. व्यावसायिक जुनी येणी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. व्यवसायात काही नवीन संकल्पनांचा वापर योग्य ठरेल. नवीन तंत्रज्ञान वापरू शकाल. जुन्या गुंतवणुका आर्थिक लाभ मिळवून देतील.
प्रगती व उन्नती होईल
वृषभ :
प्रगती व उन्नतीला पोषक असे ग्रहमान असल्यामुळे आपल्या आजूबाजूस वेगवान घटना घडतील. विविध क्षेत्रांतून लाभ मिळेल; परंतु सर्व बाबतीत शांततेने निर्णय घेतल्यास अपेक्षित गोष्टी सहज साध्य करता येतील. आर्थिक आवक उत्तम राहील. मित्र, नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. शुभवार्ता मिळतील. काहींना जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त धावपळ करावी लागेल. मात्र आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील तसेच वाहनांचा वेग मर्यादित ठेवा. अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो तसेच वाहतुकीचे नियम पाळणे हितकारक ठरेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती आहे. मात्र राजकारण आणि गटबाजीपासून अलिप्त राहा. व्यावसायिक नियम व शिस्त पाळणे आवश्यक ठरेल.
प्रयत्नांना यश मिळेल
मिथुन :
रोजच्या जीवनात अचानक बदल घडू शकतो. महत्त्वाच्या घटना जवळ झाल्यामुळे आपल्या रोजच्या दिनक्रमात सुद्धा फरक पडेल. काही सुखद प्रसंग घडतील. मात्र विचित्र स्वभावाची माणसे भेटू शकतात. नोकरीमध्ये बदल संभवतो. चालू नोकरी बदलून अधिक चांगली नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. कलाकार बुद्धिजीवी इत्यादी वर्गातील जातकांसाठी अनुकूल कालावधी. प्रसिद्धीसह अर्थार्जन वाढेल. मानसन्मानाचे योग. जवळच्या व्यक्तीसुद्धा काही वेळेस वेगळ्या वागल्यामुळे आश्चर्य वाटेल, त्यामुळे आपण विचारात पडू शकता. प्रेमप्रकरणात जरा जपूनच पुढील पावले उचलावी, गैरसमज होण्याची दाट शक्यता. विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल.
शुभकार्याची नांदी होईल
कर्क :
प्राप्त ग्रहमान आपल्याला अपवादात्मक परिस्थितीतून लाभ देऊ शकते. या कालावधीमध्ये आपली भाग्यबिजे पेरली जातील. घरामध्ये एखाद्या शुभकार्याची नांदी होईल. हातातील कामात यश मिळेल तसेच प्रिय व्यक्तींचा सहवास मिळू शकतो. नोकरीमध्ये एखादी महत्त्वाची जबाबदारी पूर्ण करण्याची जबाबदारी पडेल. तसेच व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून पुढील पावले टाकण्यास हरकत नाही. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. काही वेळेस महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, त्यातून मार्ग काढावा लागेल. कार्यक्षेत्रात वादविवादांना स्थान देऊ नका.
सहकार्य मिळेल
सिंह :
कुटुंबामध्ये काही चांगल्या वार्ता येतील. त्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. अचानक झालेले पाहुण्यांचे आगमन आश्चर्यचकित करू शकते. आप्तेष्ट इत्यादींना आपल्या मदतीची गरज लागू शकते व ती आपण उपलब्ध करून द्याल. कुटुंबातील मुला-मुलींकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीपर बातम्या कानावर येतील. काहींना परदेशगमन तसेच काहींचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी मिळेल. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. गुरुजनांचे तसेच कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. उत्पन्न वाढेल, आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.
व्यवहार गतिमान होतील
कन्या :
सदरचा कालावधी हा इच्छापूर्तीचा ठरेल. बरेच दिवस आपल्या मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होईल. परमेश्वरावर विश्वास बसेल. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत चाललेल्या अनुभवून आश्चर्य वाटेल. मात्र कुटुंबात भावा-बहिणीबरोबर वादविवादाची शक्यता. वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल. व्यवसाय-धंद्यात मोठ्या उलाढाली होतील. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक बदल घडतील. नवीन करार होऊ शकतात. व्यवसायात भागीदाराच्या मतास प्राधान्य द्या. प्रवासाचे योग येतील.
शुभग्रहांचे पाठबळ
तूळ
:
शुभग्रहांचे पाठबळ मिळाल्यामुळे आजूबाजूला सकारात्मक घटना घडतील. त्यामुळे आनंदी आणि उत्साही राहाल. आपल्यासमोरील कामे वेगाने करावीत. सामाजिक मानसन्मान मिळेल. सामाजिक कार्यामध्ये सक्रिय योगदान द्यायला एखादे महत्त्वाचे पद मिळेल. प्रसिद्धीसह आर्थिक उत्पन्न वाढेल. सहकुटुंब आपण एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल. तरुण-तरुणींना आपल्या आवडत्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. मात्र जुगारसदृश व्यवहार टाळणे हितकारक ठरेल. इतरांच्या नादी लागून चुकीची कामे होऊ शकतात. त्यातून पश्चाताप व त्रास होईल.
दिलासा मिळेल

वृश्चिक : दरच्या कालावधीमध्ये काही महत्त्वाच्या घटना घडून आपला भाग्योदय होऊ शकतो. विविध गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. मात्र स्त्री वर्गास सप्ताह थोडा अडचणीचा ठरू शकतो. वैवाहिक जीवनातील वाद-विवाद सांभाळा. आपल्या बोलण्यावर नियंत्रण हवे. समज-गैरसमज वाढू शकतात. स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. ऐकीव माहितीवर आपले मत निश्चित करू नका. नोकरीत दिलासा मिळेल. पदोन्नती, वेतनवृद्धीसारख्या घटना घडू शकतात. बौद्धिक व रचनात्मक कार्यात व्यग्र राहाल. आर्थिक बाजू भक्कम राहील.

जीवनसाथीची साथ मिळेल
धनु : कुटुंबामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण राहील. एखादे धार्मिक किंवा मंगलकार्याचे आयोजन होऊ शकते गृहसौख्य चांगले राहील. घरातील सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. जीवनसाथीची साथ मिळेल तसेच मदतही मिळेल. व्यवसाय-धंद्यात उलाढाल वाढेल. मात्र संबंधितांशी मधुर संभाषण करा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहून ताणतणाव संपुष्टात येऊ शकतो. वरिष्ठांचे तसेच हाताखालील मंडळींचे अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे बेत निश्चित कराल.
जमिनीच्या कामात यश
मकर :
पूर्वी केलेल्या नियोजनाद्वारे कामे पूर्ण होत असलेली बघून आत्मविश्वासात वाढ होईल. विविध प्रकारच्या कामांना गती मिळून कामे पूर्णत्वाच्या मार्गावर राहतील. स्थावर मालमत्ता अथवा जमिनीच्या कामात यश लाभेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. कामांमधील शिस्त पाळण्याची आवश्यकता तसेच आपले कामांमधील ज्ञान अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता आहे. हाताखालील मंडळींचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. मुला-मुलींच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष देणे क्रमप्राप्त ठरेल. त्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे ठरेल. आर्थिक परिस्थिती ठीक राहील. काही वेळेस अचानक खर्चाच्या बाबी पुढे आल्यामुळे खर्च करावा लागेल.

महत्त्वाचे काम पूर्ण होईल
कुंभ :
नोकरी-व्यवसायात विशिष्ट महत्त्वाचे काम पूर्ण होईल. नोकरी-व्यवसायात योग्य व्यक्तींकडून योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळेल. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती सफल झालेल्या अनुभवता येतील. चालू नोकरीत बदल हवा असल्यास त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास सफलता मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. मात्र कामाचा ताण जाणवेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. संयम सोडू नका. स्वतःच्या रागावर नियंत्रण आवश्यक राहील. खर्चाचे प्रमाण वाढत चाललेले दिसेल. त्यामुळे अनावश्यक खर्चाला कात्री लावणे गरजेचे ठरेल. सहकुटुंब प्रवास घडू शकतात. मात्र प्रवासात काळजी घ्या. भावंडांशी वाद टाळा.
लोकसंग्रहात वृद्धी

मीन : धार्मिक तसेच सामाजिक कार्यात रस निर्माण होईल. सामाजिक कार्यात सहकार्य द्याल. मानसन्मान वाढेल. लोकसंग्रहात वृद्धी होईल. नवीन ओळखी होतील. कार्य व्याप्ती वाढल्यामुळे काम जास्तीचे करावे लागेल. दैनंदिन कामकाजात व्यग्र राहावे. काही कामात अधिक परिश्रम घ्यावे लागण्याची शक्यता आहे. विशेषतः सरकारी स्वरूपाच्या कामांमध्ये जास्त वेळ द्यावा लागेल. काही प्रमाणात खर्च पण करावा लागेल. संयम ठेवल्यास कार्य पूर्ण करू शकाल. ध्येयापासून विचलित होणार नाही याची दक्षता घ्या. कौटुंबिक समस्या सुटतील. मात्र स्वतःच्या बोलण्यावर आणि वर्तणुकीवर नियंत्रण ठेवा. स्थावर मालमत्तेचे संबंधित असलेले वाद विवाद मिळतील.

Recent Posts

Vidhan Parishad Election 2024 : लोकसभेनंतर महाराष्ट्रात लगेच होणार विधानपरिषद निवडणूक!

जाणून घ्या कोणत्या जागांवर आणि किती तारखेला होणार मतदान... मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची…

9 mins ago

RBI : आरबीआयची नवी नियमावली; कर्ज वाटपासंदर्भात कडक सूचना जाहीर!

कॅश लोनवर असणार 'हे' नवे नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : नवे आर्थिक वर्ष…

14 mins ago

Shivaji Park Meeting : ठाकरेंना मागे सारत शिवाजी पार्कवर होणार मनसेचीच सभा!

महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी १७ मे रोजी पहिल्यांदा एकत्र मंचावर येणार मुंबई…

40 mins ago

MP Loksabha Election : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ‘या’ चार मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

जाणून घ्या नेमकं कारण काय? मध्य प्रदेश : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु…

57 mins ago

Bhupendra Jogi : ‘नाम? भूपेंदर जोगी!’ या एका डायलॉगने रातोरात प्रसिद्ध झालेल्या भूपेंद्रवर हल्ला!

पाठीला आणि हाताला ४० टाके भोपाळ : मध्यप्रदेशमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.…

1 hour ago

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची धडक कारवाई! सीक लिव्ह घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

मुंबई : एअर इंडिया एक्सप्रेसमधील (Air India Express) क्रू मेंबर्सनी अचानक एकाच दिवशी सामूहिक रजा…

2 hours ago