Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाण्यात बुधवार, गुरुवारी पाणी पुरवठा बंद

ठाण्यात बुधवार, गुरुवारी पाणी पुरवठा बंद

ठाणे  : ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये नवीन पंपिंग मशिनरी बसविण्यासाठी तसेच इतर अत्यावश्यक कामे करण्यासाठी बुधवार १२ जानेवारी रोजी सकाळी ९.०० ते गुरुवार, १३ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरू राहणार आहे.

१२ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, समतानगर, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, इंटर्निटी, कोलशेत तसेच आझादनगर या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार १२ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ९.०० ते गुरुवार १३ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत ऋतुपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा व मुंब्रा परिसरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा साठा करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -