Saturday, May 4, 2024
Homeसाप्ताहिककोलाज'पाणी' जिवंत शक्ति

‘पाणी’ जिवंत शक्ति

विशेष – डॉ. गौरी गायकवाड

आज मी एक गोष्ट तुमच्याशी बोलणार आहे. इतर गृहिणींसारखे मलासुद्धा स्वयंपाकघर लख्ख केल्याशिवाय झोप येत नाही. पण स्वच्छ करून झाल्यानंतर, गेले सहा महिने मी एक गोष्ट आवर्जून करतेय. ज्याचा मला प्रचंड फायदा झाला आहे. रात्री झोपताना मी स्वयंपाकघरातील असलेल्या देवघरामध्ये संध्याकाळी लावलेला दिवा जर विझला असेल, तर तो तर लावतेच, पण त्या सोबत पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांजवळ देखील एक दिवा लावते. ज्या दिवशी शक्य असेल, त्या दिवशी एक फूलदेखील तेथे वाहते आणि मनोभावे पाण्याच्या सर्व भांड्यांना हात जोडून कृतज्ञता व्यक्त करते.

वाचताना काही जणींना हे विचित्र वाटू शकेल, कोणाला हास्यास्पद वाटेल. पण मी स्वतः एक डॉक्टर आहे. विज्ञानाच्या परीक्षेतून तावून सुलाखून बघितल्याशिवाय सहसा कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण सहा महिन्यांपूर्वी ‘पाणी’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असे संशोधन माझ्या हाती लागले आणि त्यानंतर चक्क काही धार्मिक पुस्तकांमध्ये त्याचे जसेच्या तसे संदर्भदेखील मिळाले.

ते सोप्प्यात सोप्पे करून खाली देत आहे, नक्की वाचा

  •  पाणी म्हणजे जीवन. पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते.
  •  पाणी पिताना ज्या प्रकारचे आपले विचार असतात किंवा ज्या मानसिक स्थितीमध्ये आपण पाणी पितो, त्याचा
    प्रचंड परिणाम पाण्यावर आणि पर्यायाने आपल्यावर होतो.
  •  पाण्यामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेप्रमाणे बदल होत असतात आणि त्या बदलाप्रमाणे ते तुमच्या शरीरावर परिणाम करत असते .
  •  पाणी हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. आपल्या शरीराचा जवळपास ७०-७५% भाग हा पाण्याने बनलेला आहे. म्हणजेच शरीराचे कार्य कसे चालावे, हे मुख्यत्वे आपण जे पाणी ग्रहण करतो, तेच ठरवत असते.
  •  पाणी पितानाचे तुमचे विचार, पाण्याकडे बघण्याची तुमची दृष्टी किंवा नजर, पाणी पिताना आजूबाजूला येणारे आवाज, पाणी पिताना तुमच्या मनातील भावना किंवा तुमच्या तोंडातून निघणारे उच्चार या सर्वांचा पाण्यावर प्रचंड परिणाम होतो आणि जे प्रत्यक्षात मायक्रोस्कोपखाली बघता येते.
  •  तुमची मानसिक स्थिती जर प्रचंड सकारात्मक असेल आणि हातातील पाण्याविषयी जर तुम्ही प्रचंड कृतज्ञ असाल, तर गढूळ किंवा दूषित पाणीदेखील तुम्हाला काहीही अपाय करू शकत नाही आणि तुमची मानसिक स्थिती नकारात्मक असेल आणि पाणी पिताना जर तुम्ही पाण्याविषयी बेफिकीर असाल, तर अतिशय शुद्ध पाणीदेखील प्रचंड अपायकारक ठरू शकते.
  •  पाणी हे जिवंत असून, मानवाची मज्जासंस्था ज्याप्रमाणे कार्य करते, त्याप्रमाणे पाणी आणि त्याची पेशीसंस्था करू करते.
  •  जे पाणी हातात धरून किंवा जवळ ठेवून प्रेमाच्या भावना मनामध्ये आणल्या जातात, त्या पाण्याच्या पेशींचा किंवा कणांचा (molecule) आकार खूपच सुंदर असतो आणि जे पाणी हातात धरून किंवा जवळ ठेवून राग किंवा द्वेष अशा भावना मनात आणल्या जातात, त्या पाण्याच्या
    कणांचा आकार खूपच विचित्र आणि ओबडधोबड असतो.
  •  ज्याप्रकारे पाणी पिताना तुम्ही पाण्याला ट्रीट करता, पाणी ते खूप जास्त काळापर्यंत लक्षात ठेवते आणि त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर चांगले किंवा वाईट
    परिणाम करते.
  •  पाण्याचा विचार सध्या (liquid computer) म्हणूनदेखील केला जात असून, त्यामध्ये पाण्याचा ‘लक्षात ठेवणे’ (memory) हा गुणधर्म वापरला जात आहे.
  •  तुम्हाला जो काही चांगला उद्देश साध्य करायचा आहे, तो उद्देश एका हातात पाण्याचा ग्लास घेऊन, मग मनामध्ये बोलून मग ते पाणी पिणे यासारख्या विविध ‘Water Therepy’ सध्या पाण्याच्या गुणधर्मांचा वापर करून उदयास येत आहेत.
  •  ही सगळी वैज्ञानिक माहिती असून, ज्यांना अजून खोलवर माहिती पाहिजे असेल, त्यांनी इंटरनेटवरून डॉ. मासारू इमोटो यांचे पाण्यावरील संशोधन शोधून वाचावे. आता या पाण्याच्या दिव्य आणि शक्तिशाली क्षमतांची सांगड आपल्या संस्कृती आणि चालिरितींशी घालण्याचा प्रयत्न केल्यावर जे काही हाती लागले, त्यावरून मी खालील गोष्टी गेली ६ महिने करीत आहे.
  •  पिण्याचे पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवूनच साठवावे आणि शक्यतो तांब्याच्या ग्लासनेच प्यावे. कारण तांबे हा धातू ऊर्जेचा ‘सुवाहक’ आहे.
  •  रोज रात्री ते तांब्याचे भांडे चिंच आणि हळद वापरून धुवावे.
  •  त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी सुती कपड्यामधून गाळून भरावे.
  •  यानंतर या पाण्याच्या भांड्याच्या बाजूला एक दिवा लावून भांड्यावर एक फूल ठेवावे आणि पाण्याविषयी मनामध्ये अत्यंत कृतज्ञतेचे भाव आणून हात जोडावेत.
    (आम्हाला आयुष्य, आरोग्य आणि जीवन प्रदान केल्याबद्दल आभारी आहोत असे किंवा या प्रकारचे कोणतेही चांगले विचार मनात आणून कृतज्ञता व्यक्त करू शकता.)
  •  सकाळी उठल्यानंतर याच भांड्यातील पाणी पिऊन दिवसाची
    सुरुवात करावी.
  •  पाणी पिण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे, दोन हातांच्या ओंजळीत घेऊन पिणे; परंतु ते आपल्याला शक्य नसते. त्यामुळे पाणी पिताना, ज्या भांड्यामध्ये किंवा पेल्यामध्ये प्याल, तो दोन्ही हातांनी पकडून पाणी पिणे.
  •  पाणी पिताना जाणीवपूर्वक काही सेकंद पाण्याचा ग्लास दोन्ही हातात धरून मनामध्ये चांगले विचार, चांगल्या भावना आहेत याची खात्री करूनच पाणी प्यावे.
  •  हीच गोष्ट कोणाच्या घरी गेल्यावर किंवा बाहेर गेल्यावर कुठले पाणी पिण्याची वेळ आली, तर जाणीवपूर्वक थोडी जास्त वेळ करावी.
  •  केवळ तहान लागल्यावरच पाणी प्यावे. सारखेसारखे विनाकारण पिऊ नये.
  • आहारामध्ये पाणी जास्त प्रमाणात (८०-९०%) असलेल्या घटकांचा म्हणजेच फळांचा जास्तीत जास्त समावेश करावा.

या प्रकारे पाणी पिण्यामुळे आणि वर दिलेल्या सर्व गोष्टी गेले सहा महिने सलग केल्यामुळे पहिल्या दिवसापासून झालेले फायदे :

  • माझी लहान मुलगी जी दर महिन्याला आजारी पडत होती आणि तिला अँटिबायोटिक्स दर महिन्याला द्यावे लागत होते, ते पूर्ण बंद झाले.
  •  माझे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य खूप चांगले झाले. जे काही महिन्यांपूर्वी प्रचंड बिघडलेले होते.
  •  माझ्या घरातील लोकांचा पित्ताचा त्रास जवळपास बंद झाला आहे.
  •  रोज सकाळी घरातील वातावरण खूपच छान, हसते खेळते आणि ऊर्जेने भरलेले असते.
  •  माझा पाण्याकडे आणि एकूणच स्वयंपाक घराकडे बघण्याचा दृिष्टकोन प्रचंड बदलला आहे.
  •  एखाद्या दिवशी दिवा लावायचा विसरला, तर पाण्याच्या चवीमध्ये जाणवण्याइतका फरक असतो.

 माझ्या लहान मुलीला देखील मी ही सवय लावली आहे आणि ती या गोष्टी आनंदाने करते. याला अंधश्रद्धा समजण्याचा प्रश्न येत नाही, कारण हे सर्व वैज्ञानिक आणि तार्किकरीतीने सिद्ध झालेले मुद्दे आहेत.

आपली तीर्थक्षेत्रे, नद्यांचे कुंड, देवळांमध्ये दिले जाणारे तीर्थ किंवा जेवणापूर्वी पाण्याने ५ वेळा घेतली जाणारी अपोष्णी हे सर्व काही आपल्या संस्कृतीने पुरातन काळापासून पाण्याच्या अमर्याद अफाट आणि िजवंत शक्तीच्या अभ्यासातूनच आपल्यापर्यंत पाण्याचे महत्त्व आणि फायदे पोहोचवण्यासाठी तयार केलेले प्रकार आहेत. त्याची जाणीव ठेवणे, हे आपले आद्य कर्तव्य आहे. स्वयंपाक घरातीलच काय, आयुष्यातील एकही काम पाण्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे आजपासूनच पाण्याची ही शक्ती जाणून घ्या आणि तिचा पुरेपूर वापर करण्यास सुरुवात करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -