Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीSea food खायचंय? पण आता जिभेला घालावा लागणार आवर...

Sea food खायचंय? पण आता जिभेला घालावा लागणार आवर…

काय आहे याचं कारण?

मुंबई : काही महिन्यांपूर्वी पापलेट (Pomfret) राज्याचा राज्यमासा म्हणून घोषित करण्यात आला. त्यामुळे पापलेटच्या मासेमारीवर (Fishing) निर्बंध आले. यानंतर आता माशांचे संवर्धन (Fish conservation) व्हावे याकरता ५४ माशांचे आकारमान निश्चित करण्यात आले आहे. या आकारमानापेक्षा लहान असलेल्या माशांची मासेमारी करता येणार नाही. त्यामुळे खवय्यांना आता जिभेला थोडा आवर घालावा लागणार आहे.

बाजारात गेल्यानंतर किंवा हॉटेलमध्ये थाळीची ऑर्डर दिल्यानंतर माशांच्या आकाराकडे प्रत्येकाचं लक्ष असतं. अर्थात दर देखील याच आकारमानावरून ठरतात. दरम्यान, याच माशांचं आकारमान निश्चित करून त्यांच्या पकडण्यापासून ते खरेदी विक्रीपर्यंत राज्य सरकारनं काही निर्बंध आणले आहेत. यामध्ये सुरमई, पापलेट, बोंबील, सौदाळा, कोळंबी, खेकडा यांसह ५४ माशांचा समावेश आहे. त्यानुसार निश्चित केलेल्या आकारमानापेक्षा आकारानं लहान असलेला मासा पकडता येणार नाही. शिवाय, त्याची खरेदी विक्री देखील करता येणार नाही.

कोणत्या माशासाठी काय आकारमान?

सुरमई ३७० मिमी
बांगडा १४० मिमी
सरंगा १७० मिमी
तारली १०० मिमी
सिल्वर पापलेट १३५ मिमी
चायनीज पापलेट १४० मिमी
भारतीय म्हाकूळ १०० मिमी
झिंगा कोळंबी ९० मिमी
मांदेली ११५ मिमी
मुंबई बोंबील १८० मिमी

समुद्रातील माशांच्या संख्येत सध्या घट होत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे माशांची मागणी वाढत चालली आहे. मात्र, प्रदूषणामुळे जैव विविधतेला धोका निर्माण होत असून माशांच्या जीवनावरही याचा परिणाम होत आहे. येत्या काळात माशांचे संवर्धन झाले पाहिजे यादृष्टीने शासनाने हे निर्णय घेतले आहेत. माशांचे संवर्धन आणि लहान माशांची वाढ होऊन मत्स्यसाठा वाढणं यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी आपण खवय्यांनीही जिभेला थोडा आवर घालून या निर्णयाला सहकार्य करणं गरजेचं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -