Saturday, May 18, 2024

Wamanrao Pai : जीवाचा कान

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

मी नेहमी सांगतो, माझे प्रवचन तुम्ही तुमची पाटी कोरी ठेवून एकेका व घरी गेल्यावर त्याचे परीक्षण करा. तल्लीन होऊन ऐकले पाहिजे. सद्गुरूंचे प्रवचन जीवाचा कान करून ऐकतो तेव्हा ८५% काम होते व १५% साधना !!

सद्गुरूंनी दिलेली साधना ही केलीच पाहिजे. साधना कशी केली पाहिजे? सद्गुरू हाच देव, सद्गुरू सांगतात तो वेद, सद्गुरूंचा लागावा वेध, सद्गुरूंचे लागावे वेड, वेड म्हणजे आवड. सद्गुरू असे म्हणतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, सामान्य गुरू नव्हे, तर शाब्देपरेचि निष्णात आत्मज्ञानी सद्गुरूंबद्दल मी हे बोलतो आहे. त्यांचे प्रबोधन, त्यांचे प्रवचन, त्यांचे मार्गदर्शन जर तुम्ही जीवाचा कान करून ऐकले तर तुमचे ८५ टक्के काम होते. १५ टक्के ही साधना. ही साधना कशी व्हायला पाहिजे तर ती सांगितली त्याप्रमाणे व्हायला पाहिजे.

सद्गुरू हाच देव, सद्गुरू सांगतात तो वेद, सद्गुरूंचा लागावा वेध, सद्गुरूंचे लागावे वेड. त्यावेळी सुद्धा प्रश्न निर्माण झाला तर सद्गुरूंना विचारायला काही हरकत नसते. सद्गुरूंना प्रश्न विचारलेच पाहिजेत. दुसऱ्या कोणाला तरी विचारून काय उपयोग? आमच्या मंडळात काय होते, एक साधक दुसऱ्या साधकाला विचारतो. तो साधक धड नसतो व हाही धड नसतो. दोन्ही इम्परफेक्ट, त्यातून गोंधळ निर्माण होतो. असे होता कामा नये. सद्गुरू जर हयात असतील तर त्यांना विचारले पाहिजे. प्रथम साधना करा, त्यानंतर विचारा, म्हणजे तुम्हाला फायदा होतो. कोणाला तरी विचारून नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे, कारण तो परफेक्ट नसतो.

सांगायचा मुद्दा असा की, सद्गुरूंचे प्रवचन ऐकल्यावर किती फायदा होतो?, तर खूप फायदा होतो, म्हणून श्रवणाला फार महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. नवविधा भक्तीत श्रावणाला फार महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात.

“मंत्रेची वैरी मारे, तरी का बांधावी कट्यारे
मनाचा मार ना करता, इंद्रिया दुःख न देता मोक्ष असे आयता श्रावणाची माजी”.

श्रवणाचे किती महत्त्व सांगितले आहे, त्याने १००% काम होते, असेच ज्ञानेश्वर माऊलींना म्हणायचे असावे, पण थोडीतरी साधना पाहिजेच. साधना नसेल तर काय होते? गम्मत अशी की, कळणे आणि वळणे ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. कळणे ठीक आहे, पण वळणे महत्त्वाचे आहे. आपल्या मनाला, बुद्धीला, ज्ञानेंद्रियांना जे वळण पडलेले आहे, त्यांना इष्ट वळण देण्याचे काम सद्गुरूंनी दिलेली साधना करते. कळणे व वळणे ह्यांत पूल आहे व हा पूल ओलांडण्यासाठी साधना महत्त्वाची आहे. माझे मत असे की, ८५ टक्के श्रवण व १५ टक्के साधना केली, तर तुम्ही साक्षात्कारापर्यंत जाऊ शकता आणि त्यासाठीच सद्गुरूंचे प्रवचन जीवाचा कान करून ऐकले पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -