Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाUnder 19 World Cup 2024: टीम इंडिया २०२३च्या वर्ल्डकपच्या पराभवाचा बदला घेणार?

Under 19 World Cup 2024: टीम इंडिया २०२३च्या वर्ल्डकपच्या पराभवाचा बदला घेणार?

मुंबई: आज २०२४ अंडर १९ वर्ल्डकपचा(u19 world cup) फायनल सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर कांगांरूंचे आव्हान आहे. अशातच युवा संघ भारताला २०२३च्या वर्ल्डकप फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीने मैदानात उतरतील. भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

आयसीसी स्पर्धा, फायनल आणि भारतआणि ऑस्ट्रेलिया…गेल्या एका वर्षात तिसऱ्यांदा हे घडत आहे. याआधी गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकपचा फायनल सामना

कांगारूंशी हिशेब बरोबर करण्याची वेळ

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आला होता. दरम्यान, दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली. मात्र यावेळेस आकडे काही वेगळेच सांगत आहे.

कांगारूंनी केलेल्या पराभवाचा बदला घेण्याची वेळ आली आहे. भारताच्या युवा संघाकडे रोहित, शमी आणि कोहलीचा बदला घेण्याची संधी आहे. भारतीय संघ अंडर १९ वर्ल्डकप २०२४मध्ये आतापर्यंत अजेय राहिला आहे. त्यांनी आपल्या सर्व सामन्यात दमदार विजय मिळवला आहे. सेमीफायनलमध्ये तर युवा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला.

फायनलमध्ये भारताचे पारडे जड

आतापर्यंत अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहासात फायनलमध्ये दोन वेळा भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले. दोन्ही वेळेस टीम इंडियाने बाजी मारली. आता दोन्ही संघादरम्यान तिसऱ्यांदा अंडर १९ वर्ल्डकपचा फायनल सामना खेळवला जाईल. अशातच टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -