Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीकार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

निवडणुका घेण्याचे आयोगाकडून संकेत

नाशिक: राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आणि नियमाप्रमाणे आपला कार्यकाळ पूर्ण केलेल्या तसेच जिल्ह्यातील स्थानिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिल्यामुळे निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी केली असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने तसेच पोलीस विभागाने याबाबतची यादी तयार केली असल्याचे प्रशासकीय सुधारणाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये आता नवीन प्रशासकीय अधिकारी येणार आहे.

पाच वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्ह्यात कार्यरत असलेले व स्वजिल्ह्यात तीन वर्षे सेवा बजावल्यामुळे पोलीस, महसूल, राज्य उत्पादन शुल्क, महापालिका, नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली असून, संभाव्य बदल्या टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची लॉबिंग सुरू झाली आहे. तर आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व गदपत्रे, नगरपालिकांच्या निवडणुक होऊ घातल्या आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्षपातीपणे पार तयारी पडाव्यात तसेच प्रशासकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी एकाच ठिकाणी काही वर्ष कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निवडणूक आयोगाचे धोरण आहे.

त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठवून या बदल्या करण्याबाबत सुचित केले आहे. लवकरच राज्यातील १५ महापालिका, २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्या तसेच २१३ नगर परिषदा व दोन हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली मुक्त वातावरणात पार पडाव्यात असा आयोगाचा त्यामागचा हेतू आहे. एकाच ठिकाणी काही वर्ष कार्यरत असलेले शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थानिक पातळीवर राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध निर्माण होतात व त्यातून प्रत्यक्ष निवडणूक काळात हे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून परीचिताना झुकते माप देतात त्यामुळे निवडणूक मुक्त वातावरणात पार पडणे शक्य नसल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.

त्यामुळे पाच वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्ह्यात वास्तव्यास असलेले व स्वजिल्हा म्हणजे त्याच जिल्ह्यातील रहिवासी असताना तीन वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर अथवा निवडणुकीशी संबंध येणार नाही, अशा ठिकाणी बदल्या आयोगाकडून करण्याची शिफारस करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -