Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीspace : जगातील सर्वात महागडे शौचालय अंतराळात

space : जगातील सर्वात महागडे शौचालय अंतराळात

१ अब्ज रुपयांहून अधिक खर्च

सिंगापूर (वृत्तसंस्था) : १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन साजरा केला जातो. (space) त्यानिमित्त जगातील सर्वात महागड्या शौचालयाची सध्या चर्चा आहे. या सोन्याच्या टॉयलेटसाठी १ अब्ज रुपयांहून अधिक खर्च आला आहे.

जगातील सर्वात महागडे शौचालय राजघराणे किंवा कोणत्याही श्रीमंत व्यक्तीकडे असेल असे तुम्हाला वाटतं असेल, तर तुमचा हा अंदाज चुकीचा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जगातील सर्वात महागडे शौचालय पृथ्वीवर नाही, तर अंतराळात आहे. हे शौचालय स्पेस स्टेशनमध्ये आहे. रिपोर्टनुसार, जगातील हे सर्वात महागडे शौचालय सोन्यापासून बनवण्यात आले आहे. हे शौचालय बनवण्यासाठी सुमारे १९ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे १ अब्ज, ३६ कोटी, ५८ लाख, ७२ हजार रुपये खर्च आला आहे. याची देखभाल करण्यासाठीही मोठा खर्च येतो.

जागतिक शौचालय दिन साजरा करण्याची सुरुवात सिंगापूर येथील जॅक सिम यांनी १९ नोव्हेंबर २००१ पासून केली. २००१ साली जॅक यांनी डब्ल्यूटीओ म्हणजेच वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनाइजेशनची स्थापना केली. यानंतर २०१३ साली संयुक्त राष्ट्र संघाकडून १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. जनसामान्यांमध्ये शौचालयाचे महत्त्व समजून लोकांना उघड्यावर शौच करण्याला प्रतिबंध करणे हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. लोकांना शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी जागतिक शौचालय दिन साजरा केला जातो.

जागतिक शौचालय दिन २०२२ साजरा करण्यासाठी दरवर्षी एक वेगळी थीम ठेवली जाते. या दिवशी लोकांना शौचालयाचे महत्त्व सांगून जागरूक केले जाते. २०२२ ची थीम ‘मेकिंग द इनविजिबल विजिबल’ ही आहे. याचा अर्थ दृष्टीआड असलेली गोष्ट दृष्टीसमोर आणणे. मीडिया रिपोर्टनुसार, जगातील ३.६ अब्ज लोकांना योग्य शौचालयांची सोय नाही, तर ६७३ दशलक्ष लोक उघड्यावर शौच करतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -