Share

हलकं-फुलकं – राजश्री वटे

दिवार म्हटलं की, आधी डोळ्यांसमोर येतो, तो अमिताभ बच्चन यांचा चित्रपट. खूप गाजला त्यावेळी. अमिताभ यांचे डायलॉग कमाल!
पब्लिक एकदम खल्लास!
आपण हिंदी ‘दिवार’बद्दल नाही, तर आपल्या भिंतीबद्दल बोलू या.

भिंत म्हणजे घराचे सुरक्षा कवच. ज्यात जीवन सुरक्षित राहते. ऊन, थंडी, पाऊस यांपासून संरक्षण देते, ती भिंत व तिने पेललेलं छप्पर. ही भिंत आधार देते, छप्पर, सावली देते. भिंत घरातील व्यक्तींच्या सुख-दु:खाची साक्षीदार असते. ‘भिंतीला कान असतात’ अशी म्हण आहे. पण घरात राहणाऱ्या लोकांचे गुपित चार भिंती आड झाकून ठेवण्याचे सामर्थ्यही तिच्यात असतं. थरथरत्या शरीराला प्रथम आधार मिळतो, तो भिंतीचाच!

लहान मुलांना भिंत फार प्रिय. लहान मुलांना बोटात पेन्सिल धरून, रेघोट्या मारायला आधी दिसते, ती भिंतच. ती पण अंगभर त्यांच्याकडून रंगपंचमी खेळून घेते. कधी अ…आ…इ…चा फळा बनते!
घराचं आतील सौंदर्य वाढतं हिच्यामुळे. सुंदर पेंटिंग्स, हँगिंग अलगद पेलून धरते. त्यासाठी खिळ्यांची टोक ही सहन करते बिचारी. घर सुंदर दिसायला, ती हेही करते. मग दिमाखाने म्हटलं जातं ‘सुंदर माझं घर’ याच्या पाठीशी असते भिंत!!

स्त्रीच्या नाजूक हातांनी शेणाने सारवलेली भिंत जी ऊन शोषून घेते, घरातल्यांना गारवा देते. कारण तिच्यावररून फिरला असतो प्रेमाचा हात. पावसाळ्यात बिचारी स्वत: पावसाचा मारा सहन करत, कशी तरी तग धरून उभी राहते. कधी कोसळतेसुद्धा हतबल होऊन!

खेडेगावातल्या भिंती अंगभर शेणाच्या गवऱ्या अभिमानाने लेवून घेते, सुकवते. जेव्हा या गवऱ्यांवर घरातील चूल जळते, तेव्हा समाधानाने तो धूर श्वासात भरून घेते, फार सुखावते ही भिंत!!!

आज जग पुढे जाताना, भिंतीने स्वत:तही बरीच सुधारणा केली आहे, ती आता पहिल्यासारखी लेचीपेची राहिली नाही. आजच्या स्त्रीसारखी मजबूत झाली आहे. साध्या धक्क्याने कोलमडणारी राहिली नाही ती!

घराच्या आतील तर सौंदर्य वाढवतेच ती पण… बाहेरील संरक्षक भिंत ही स्वत:च्या अंगावर वेली, फुलं लपेटून अंगणात मिरवते. भिंतीच्या अनेक कहाण्या आहेत… एवढी पक्की दगडाची भिंत पण ज्ञानेश्वरांनी चल म्हटल्याबरोबर निघाली. चौघा बहीण-भावांना पाठीवर बसवून दिमाखात. त्यांच्यापुढे चांगदेवाचा वाघसुद्धा घाबरला!

ठाण्यामध्ये ‘माणुसकीची भिंत’ म्हणून चर्चेत आहे. गरजूंना लागणाऱ्या कोणत्याही वस्तू तिथे ठेवायच्या, गरजू जे लागेल ते घेऊन जातात. विनाशुल्क! समाजसेवकांच्या देखरेखीखाली अतिशय शिस्तपद्ध पद्धतीने हे कार्य केले जाते… खरी माणुसकीची भिंत!!

भारताबाहेरच्या एका देशात एका चहाच्या हॉटेलमध्ये कुपन पद्धतीने चहा मिळतो. कुपन घ्या… चहा प्या! पण एक कप चहा प्यायचा असला, तरी दोन कुपन कम्पल्सरी… एक स्वत:साठी व दुसरे भिंतीवर चिटकवायचे! हॉटेलची एक भिंत फक्त कुपनसाठी.जे गरीब लोक पैसे देऊन, चहा पिऊ शकत नाही, ते तिथे येतात.

भिंतीवरील एक कुपन घेतात, चहा पितात, निघून जातात, परोपकारी भिंत! किती छान समाजसेवा! भिंतीच्या सहयोगाने… आजकाल सार्वजनिक भिंतींवर कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून सुंदर संदेश देणारे पेंटिंग काढून घेतल्या जातात, रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी! पूर्वी या भिंतींची अवस्था बोलायलाच नको त्याबद्दल किती दु:ख होत असेल तिला लोकांच्या वाईट सवयींचे!

Tags: wall

Recent Posts

एक ग्लास पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून बनवा हे ड्रिंक, उन्हाळ्याचा नाही होणार त्रास

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. यामुळे प्रत्येक मोसमात खूप पाणी…

39 mins ago

विराट कोहलीला सलामीला उतरवा, टी-२० वर्ल्डकपसाठी सौरव गांगुलीचा रोहितला सल्ला

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४साठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. टी-२० वर्ल्डकपच्या ९व्या हंगामाचा शुभारंभ अमेरिका…

2 hours ago

‘भगव्या आतंकवादा’ला स्थापित करण्याचे षडयंत्र विफल!

दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे निर्दोषत्व सिद्ध; साधक निर्दोष मुक्त! पुणे : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी…

3 hours ago

Taam Ja Blue Hole : अजब गजब! ड्रॅगन होलपेक्षाही अधिक जास्त खोलाचा ‘हा’ खड्डा

संशोधकांच्या उंचावल्या भुवया; जाणून घ्या सविस्तर माहिती मेक्सिको : जगभरात विविध घडामोडी घडत असताना संशोधक…

3 hours ago

Jalana Voting : मतदानापूर्वीच जालन्यात शेकडो मतदानपत्रांचा कचरा!

व्हिडीओ होतोय व्हायरल; नेमकं प्रकरण काय? जालना : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सध्या जोरदार प्रचार…

3 hours ago

LS Election : पालघर लोकसभा मतदार संघाचे सह निरीक्षक म्हणून आमदार नितेश राणे यांची नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार नियुक्ती पालघर : कणकवली, देवगड,…

4 hours ago