Eiffel tower : आयफेल टॉवर…

Share
  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

आयफेल टॉवर फ्रान्सचे जागतिक सांस्कृतिक प्रतीक आहे आणि जगातील उत्तम वास्तुशास्त्राचा एक नमुना आहे. अतिभव्य असलेला हा टॉवर जगातील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे.

माणसाचे प्रत्येक स्वप्न साकार होतेच असे नाही, कदाचित म्हणूनच त्याला ‘स्वप्न’ म्हटले जाते. शाळेत सातवी इयत्तेत शिकत असताना ‘आयफेल टॉवर’विषयी आमच्या इंग्रजी विषय शिकवणाऱ्या बापट बाईंनी खूप गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या. त्यांचे यजमान या टॉवरच्या देखभालीच्या काळात अभियंता म्हणून तेथे काम पाहत होते. त्या सुट्टीच्या दरम्यान तिथे गेल्या होत्या. तेव्हा अनेकदा आयफेल टॉवर चढून आलेल्या होत्या. त्यांच्याकडून त्या टॉवरविषयीची काही माहिती आणि महत्त्वाचे म्हणजे अनेक छोट्या-मोठ्या गमती-जमती सांगितल्या होत्या. तेव्हापासून आयफेल टॉवर पाहण्याचे स्वप्न मनात होते.

कॉलेजमध्ये शिकत असताना जर्मन हा विषय घेतलेला होता. त्या काळात जर्मन डिपार्टमेंटचा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या असलेल्या डॉ. डिसल्वा मॅडमने आयफेल टॉवरविषयी भरभरून माहिती दिली. काही फोटोही त्यांनी आम्हाला दाखवण्यासाठी सोबत आणलेले होते, हे अजूनही आठवतेय.

त्यानंतर अनेक मित्र-मैत्रिणी आपल्या कुटुंबीयांसोबत आयफेल टॉवरवर जाऊन आले, त्यांचे फोटो व्हीडिओ अजूनही डोळ्यांसमोर आहेत. या आयफेल टॉवरसमोर अनेक प्रियकरांनी आपल्या प्रेयसीपुढे वाकून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती, असेही अधूनमधून वाचण्यात आले होते.

भव्य आयफेल टॉवर फ्रान्सचे जागतिक सांस्कृतिक प्रतीक आहे आणि जगातील उत्तम वास्तुशास्त्राचा एक नमुना आहे. अतिभव्य असलेला हा टॉवर जगातील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे, हे आपण जाणतोच.

अलीकडे आयफेल टॉवरला भेट देण्याची संधी मिळाली. त्याची भव्यता अवर्णनीय आहे, हे प्रत्यक्ष अनुभवता आले. निवांतपणे त्याच्या पायथ्याशी थांबून, त्यापासून थोडे दूर जाऊन त्याला पाहिले. त्याला दिवसा उजेडी पाहिले, तसेच रात्री रोषणाईने सजलेले पाहिले. आपण पॅरिसमध्ये कुठेही फिरत असताना, चालताना बसमधून जाताना, ट्रेनमधून जाताना इतकेच नव्हे, तर बोटीमधून फेरी मारताना आयफेल टॉवर दिसत राहतो.

मॉन्टपार्नासे टॉवर ही पॅरिसमधील सर्वात उंच इमारत आहे आणि ५९ मजली इमारतीच्या टेरेसवरून संपूर्ण पॅरिस पाहण्याचा आनंद घेता येतो, तेथूनही आयफेल टॉवर पाहिला.

सोशल मीडियावर या आयफेल टॉवरशी संबंधित एक पोस्ट व्हायरल झाली होती की, एका फ्रेंच रहिवाशाने आठ वर्षे मेहनत घेऊन, माचिसच्या काड्यांपासून आयफेल टॉवर बनवला; परंतु त्यांच्या एका चुकीमुळे त्यांची गिनीज वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली नाही, हेही तेथे उभे असताना आठवले.

गुस्ताव्ह आयफेल या फ्रेंच वास्तुशास्त्रकाराला आयफेल टॉवर निर्मितीचे श्रेय दिले जाते. फ्रेंच क्रांतीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ सुमारे ३०० कामगारांनी १८,०३८ अतिशुद्ध लोखंडाचे भाग वापरून आयफेल टॉवर बांधला. १८८९ ते १९३० या काळादरम्यान हा टॉवर उभा राहिल्याचे आपण सर्व जाणतोच. १,०६३ फुटांच्या आयफेल टॉवरच्या तीनही मजल्याला भेट देता आली. भन्नाट गार वारा अनुभवत, पॅरिसच्या भव्यदिव्य आयफेल टॉवरच्या सर्वात वरच्या मजल्यावरून पॅरिस पाहताना, जगातले सर्वात सुखी आपणच असा भास झाला. पण किती काळ तिथे थांबणार? शेवटी खाली उतरावेच लागले!

इथे मला जॉनी लिव्हरची मुलाखत आठवली. त्यात त्यांना मुलाखतकाराने एक प्रश्न विचारला होता की, “कोणे एके काळी तुमची चलती होती. सिनेमामध्ये तुमच्यासाठी खास भूमिका तयार केली जायची. तुम्हाला मान-सन्मान होता. आता तसे काही राहिले नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटते?” याचे उत्तर जॉनी लिव्हरने फार सुंदर दिले होते. तो म्हणाला की, “एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. तिथे फार काळ राहता येत नाही. तशी परिस्थिती तिथे नसते. कारण मोठ्या प्रमाणात प्राणवायूची कमतरता तेथे भासते. त्यामुळे तेथे झेंडा लावून आपल्याला पायथ्यापाशी उतरावेच लागते. मी माझ्या आयुष्यात तेच केले आहे. मी माझ्या अभिनयाचा ठसा सिनेसृष्टीवर उमटवला आहे म्हणजेच झेंडा रोवला आणि आता परत खाली आलो आहे, याबद्दल मला स्वतःला खूप आनंद आहे.”

त्यामुळे पॅरिस किंवा आयफेल टॉवरविषयी मी भरभरून लिहिले असले, तरी मला एवढेच सांगायचे आहे की, माझे माझ्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न संपन्न झाले आहे!

प्रत्येक माणसाने आपल्या उराशी स्वप्न बाळगावी, परंतु ती कशी पूर्ण करता येईल, याकडेही लक्ष पुरवावे, हेच मला सांगायचे आहे.

pratibha.saraph@ gmail.com

Tags: Eiffel Tower

Recent Posts

Hindu temples : मुंबईतील प्राचीन मंदिर बाबुलनाथ

कोकणी बाणा : सतीश पाटणकर मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला…

5 hours ago

प्रेमकहाणी भाग-१

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…

5 hours ago

Drought : डोळे उघड माणसा…

विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…

5 hours ago

Mahabharat : महाभारत युद्धातील जेवण व्यवस्थेचे रहस्य

विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…

5 hours ago

साठवण…

विशेष : नीता कुलकर्णी गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची... आमच्या परीक्षा झाल्या की, आई वर्षभराच्या…

5 hours ago

Nostalgic song : हसता हुवा नुरानी चेहरा…

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…

5 hours ago