Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीSSC HSC Supplementary Exam : प्रतिक्षा संपली! दहावी-बारावीच्या पुरवणी परिक्षेचा निकाल उद्या...

SSC HSC Supplementary Exam : प्रतिक्षा संपली! दहावी-बारावीच्या पुरवणी परिक्षेचा निकाल उद्या लागणार

कुठे पाहाल निकाल?

पुणे : गेल्या महिन्यात व या महिन्याच्या सुरुवातीला दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा (SSC HSC Supplementary Exam) घेण्यात आली होती. दहावीची परिक्षा १० जुलै ते १ ऑगस्ट तर बारावीची परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच २८ ऑगस्टला दुपारी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन (Online) पद्धतीने त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या ‌www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. यात विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी प्रथमतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असणार आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -