Sunday, May 5, 2024
Homeक्रीडा२२ डिसेंबरपासून सुरू होणार प्रो-कबड्डी लीग

२२ डिसेंबरपासून सुरू होणार प्रो-कबड्डी लीग

एका हंगामाच्या ब्रेकनंतर प्रो-कबड्डी लीगचा आठवा हंगाम बुधवारपासून (२२ डिसेंबर) सुरू होत आहे. बंगळूरूमध्ये रंगणाऱ्या नव्या हंगामामध्ये १२ संघ नशीब अजमावतील. कोरोना तसेच ओमायक्रॉन विषाणूंच्या सावटामुळे प्रेक्षकांविना लीग खेळली जाणार आहे. तरीही कबड्डीप्रेमींमध्ये लीगच्या पुनरागमनाबाबत मोठी उत्सुकता आहे.

प्रो-कबड्डी लीगमध्ये दररोज दोन ते तीन सामने खेळले जातील. मात्र, तिन्ही सामन्यांची वेळ वेगळी असेल. जिथे पहिला सामना संध्याकाळी ७:३० वाजता, दुसरा सामना ८:३० वाजता आणि तिसरा सामना रात्री ९:३० वाजता खेळवला जाईल. पहिल्या दिवशी, बंगळुरू बुल्स विरुद्ध यू मुंबा, तेलुगु टायटन्स विरुद्ध तामिळ थलायवास आणि बंगाल वॉरियर्स विरुद्ध यूपी योद्धा असे तीन सामने होतील. प्रो-कबड्डी लीग २० जानेवारीपर्यंत खेळवली जाणार आहे.

कोरोनामुळे मागील वर्षी ही स्पर्धा झाली नाही. गत हंगामामध्ये (२०१९) बंगाल वॉरियर्सने विजेतेपद पटकावले होते. नव्या हंगामात त्यांच्यासह माजी विजेता यू मुंबा, गुजरात जायंट्सकडे जेतेपदाचे प्रबळ दावेदार पाहिले जात आहे. यंदाच्या लिलावात दबंग दिल्लीचा माजी डिफेंडर रविंदर पहलसाठी ७४ लाख मोजून गुजरातने करारबद्ध केले. त्याचबरोबर पुणेरी पलटनच्या गिरीश इरनाकलाही गुजरातने २० लाखांना खरेदी केले आहे. मागील सिझनमध्ये गुजरातच्या राईट आणि लेफ्ट कॉर्नरच्या डिफेंडर्सनी निराश केले होते. त्यामुळे यंदा त्यांनी अनुभवी डिफेंडर्सचा टीममध्ये समावेश केला आहे.

‘डू ऑर डाय’ स्पेशालिस्ट महेंद्र गणेश राजपूत हा आठव्या हंगामाद्वारे पुनरागमन करतोय. युवा रेडर रतन यंदा गुजरातकडून पदार्पण करणार आहे. कर्नाटकच्या रतन याला गुजरातने २५ लाखांमध्ये खरेदी केले आहे. सुनील कुमार हा गुजरातच्या टीमचा कॅप्टन आहे. तो बऱ्याच कालावधीपासून या टीमचा सदस्य आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -