Monday, May 20, 2024
Homeदेशएसबीआयकडून निवडणूक रोख्यांचे क्रमांकही निवडणूक आयोगाला सादर

एसबीआयकडून निवडणूक रोख्यांचे क्रमांकही निवडणूक आयोगाला सादर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टेट बँक इंडियाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोख्यांचे नंबरही गुरुवारी निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने या संदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

प्रतिज्ञापत्रात स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, “इलेक्ट्रोल बाँडच्या अल्फान्युमरिक नंबरसह संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाला यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते. निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले गेले असताना स्टेट बँक ऑफ इंडियाने फक्त निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्या व्यक्ती, आणि संस्था यांची माहिती एका पीडीएफमध्ये तर कोणत्या पक्षांनी हे रोख वठवले यांची माहिती दुसऱ्या पीडीएफमध्ये अशा प्रकारे ही माहिती दिली होती.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन दिनेश कुमार खारा यांनी यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांबद्दलची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर केली आहे, यामध्ये रोख्यांच्या युनिक नंबरचाही समावेश आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -