Sunday, May 19, 2024
Homeनिवडणूक २०२४Nitesh Rane : औरंगजेबाची पंतप्रधानांशी तुलना म्हणजे समस्त देशातील नागरिकांचा अपमान!

Nitesh Rane : औरंगजेबाची पंतप्रधानांशी तुलना म्हणजे समस्त देशातील नागरिकांचा अपमान!

संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना औरंगजेबाच्या कबरीजवळ दोन कबरी खोदण्याची घाई

आमदार नितेश राणे यांचा घणाघात

मुंबई : ‘संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) आणि त्याच्या मालकाला औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला दोन कबर खोदून घेण्याची घाई लागलेली आहे. हे दोघं जेवढं देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करतील तेवढं जास्त स्वतःहून त्या खड्ड्यात पडत जातील’, असं वक्तव्य भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलं. ठाकरे गटाचे (Thackeray group) खासदार संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची तुलना औरंगजेबाशी केल्यामुळे नितेश राणे यांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला.

नितेश राणे म्हणाले, एका बाजूला संजय राजाराम राऊतचा मालक आणि त्याची मालकीण मुलाला वाचवण्यासाठी दिल्ली दौरे करतात, कुठल्याही अटीशर्तीविना आम्हाला भाजपासोबत युती करायची आहे अशा मागण्या करतात आणि दुसर्‍या बाजूला आपल्या पाळलेल्या कुत्र्याला पंतप्रधान आणि भाजपावर सातत्याने भुंकायला लावतात. मी संजय राऊतला सांगेन की पंतप्रधानांवर टीका करणारं तुझं थोबाड जर बंद केलं नाही तर त्याच्या मालकाची आणि मालकाच्या मुलाची अशी माहिती महाराष्ट्रासमोर दिली जाईल की दिवसरात्र औरंगजेबच आठवेल, असं ओपन चॅलेंज नितेश राणे यांनी दिलं.

ज्या औरंगजेबने हिंदूंची मंदिर तोडली, हिंदूंचा द्वेष केला त्याच्याबरोबर आमच्या आदरणीय पंतप्रधानांची तुलना करणं, हा समस्त देशातील नागरिकांचा अपमान करण्यासारखं आहे. आमच्या पंतप्रधानांच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत हिंदू समाजाला मान मिळाला आहे, काँग्रसेच्या काळात हिंदूंची मंदिरं अंधारात गेली होती ती सुधारण्याचं काम मोदींनी केलं आहे, पाचशे वर्षांपासून असलेली श्रीराम मंदिराची मागणी पंतप्रधानांच्याच दहा वर्षांच्या काळात पूर्ण झाली, म्हणून नाईन्टी किती मारायची याला काहीतरी मर्यादा असते, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

खिचडीचोरी, भ्रष्टाचार हा संजय राऊतचा मूळ व्यवसाय

ईडी, सीबीआय हा मोदींचा जुना व्यवसाय आहे, असं संजय राऊत म्हणाले. यावर नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, खिचडीचोरी करणं, कोविडच्या नावाने भ्रष्टाचार करणं हा ज्याचा मूळ व्यवसाय आहे त्याने व्यवसायाबद्दल बोलू नये. ज्या काँग्रसेच्या प्रेमात हा पडला आहे, त्या काँग्रेसचं ईडी आणि सीबीआयवर किती प्रेम होतं, सुप्रीम कोर्टाने तेव्हा ईडी, सीबीआयच्या मुद्द्यावर काँग्रेसबद्दल काय सांगितलं होतं हे गजनी झालेल्या संजय राऊतने आठवावं आणि मग आमच्यावर आरोप करावा, अशी सणसणीत टीका नितेश राणे यांनी केली.

राजसाहेब येतायत ही चांगली गोष्ट

मनसे महायुतीत सामील होण्याबाबत प्रश्न विचारला असता नितेश राणे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांची आज मुंबईत महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक झाली, तसेच दिल्लीतही अमित शहांसोबत त्यांची बैठक झाली. त्यामुळे राजसाहेबांना जर महायुतीत सामील व्हायचं असेल, तर ही चांगली गोष्ट आहे, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -