Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजThanks giving day : कृतज्ञता...

Thanks giving day : कृतज्ञता…

  • हलकं-फुलकं : राजश्री वटे

रोज सकाळी उठल्याबरोबर प्रथम देवाचे आभार मानायला पाहिजेत की, आजचा सूर्योदय बघायला मिळतो आहे, चांगले आरोग्य लाभले आहे, आजचा दिवस खूप आनंदात जाणार आहे. यांसारख्या अनेक सकारात्मक गोष्टींची कृतज्ञता व्यक्त करायची, देवा… तुझ्यामुळेच!

नोव्हेंबर महिन्यात परदेशात “Thanks giving day” साजरा करतात. खरंच, भारी वाटली ही कल्पना! व्यक्त होणं… दुसऱ्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं… किती छान कृती आहे. पूर्वी असं व्यक्त होणं वगैरे म्हणजे औपचारिकता वाटत असे, पण आजकाल समोरच्या व्यक्तीबद्दल असलेली भावना बोलून दाखवणे म्हणजेच व्यक्त होणे प्रचलित झाले आहे आणि त्यात वावगं नाहीच मुळी… एक सुंदर संकल्पना आहे ती! आचरणात आणलीच पाहिजे, स्वत:साठी व दुसऱ्यांसाठी सुद्धा…

समोरच्याने सकारात्मक काही केले की लगेच दुसऱ्याकडून ‘Thank you’ म्हटलं जातं. खरं तर मराठी भाषेत धन्यवाद, आभारी आहे असे शब्द आपण वापरतो. पण Thank you मध्ये जे आहे ते आहे… ते ऐकताच एखादी व्यक्ती कितीही गंभीर असली तरी एक स्माईल देणारच… एव्हढी जादू आहे त्यात!

लहान मूल बोलायला लागलं की, त्याला दोन-चार मुख्य शब्दांमध्ये thank you शिकवलं जातं आणि बोबड्या बोलीत त्यानं म्हणायचं… केव्हढं कौतुक त्याचं.

आयुष्यात अनेक व्यक्ती येतात… जातात… जवळचे कायम हृदयात स्थान मिळवून असतात. पण त्याना गृहीत धरलं जातं, व्यक्त होणं राहून जातं, काही दूर निघून गेलेली असतात… कदाचित पुन्हा न भेटण्यासाठी… ज्या व्यक्ती काही काळाकरिता आयुष्यात येतात व जातात, तेव्हढाच संबंध येतो. पण बरंच काही शिकवून जातात, त्यांना Thanks दिले असतात का कधी… आठवून बघा?

म्हणूनच या “Thanks giving day”ची संकल्पना फार आवडली, वर्षातून एकदा हा दिवस येतो दुसऱ्याच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी! अवतीभवती असणाऱ्या सगळ्या वयाच्या, सर्व स्तराच्या व्यक्तींना असा आदर देणे, त्यांचा सन्मान करणे यांसारखी समाधानाची भावना दुसरी नाहीच आणि हे समाधान आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आहे… तत्काळ अमलात आणा, कृती करा व समाधान मिळवा!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -