Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाAsia cup India team : आशिया कप २०२३ साठी टीम इंडियाची घोषणा!...

Asia cup India team : आशिया कप २०२३ साठी टीम इंडियाची घोषणा! कोणाचे कमबॅक आणि कोणाचा झाला पत्ता कट?

‘या’ दिग्गज खेळाडूंना मिळाली संधी

नवी दिल्ली : विश्वचषकासाठी रंगीत तालमीप्रमाणे असणार्‍या आशिया चषकासाठी (Asia Cup 2023) भारतीय संघाची (India team) निवड करण्यात आलेली आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar), मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात नवी दिल्ली येथे जवळपास दोन-अडीच तास बैठक झाल्यानंतर अखेर निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशन आघाडीचे फलंदाज असतील तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर असेल. हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार आहे.

३० ऑगस्ट २०२३ ते १७ सप्टेंबर २०२३ या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. विशेष बाब म्हणजे दुखापतीतून सावरत असणाऱ्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे या निमित्ताने भारतीय संघात कमबॅक झाले आहे तर युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांचा मात्र पत्ता कट झाला आहे. दुसरीकडे तिलक वर्मा प्रथमच एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

इशान किशन आणि केएल राहुल यांचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना संघात स्थान दिले आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव , टिळक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).

जाणून घ्या आशिया चषकाचे वेळापत्रक -:

  • ३० ऑगस्ट – पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान
  • ३१ ऑगस्ट – बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी
  • २ सप्टेंबर – पाकिस्तान वि. भारत, कँडी
  • ३ सप्टेंबर – बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर
  • ४ सप्टेंबर – भारत वि. नेपाळ, कँडी
  • ५ सप्टेंबर – श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर
  • ६ सप्टेंबर ( सुपर ४) – A1 वि. B2, लाहोर
  • ९ सप्टेबंर ( सुपर ४) – B1 वि. B2, कँडी
  • १० सप्टेंबर ( सुपर ४) – A1 वि. A2, कँडी
  • १२ सप्टेंबर ( सुपर ४ ) – A2 वि. B1, दाम्बुला
  • १४ सप्टेंबर ( सुपर ४ ) – A1 वि. B1, दाम्बुला
  • १५ सप्टेंबर ( सुपर ४) – A2 वि. B2, दाम्बुला
  • १७ सप्टेंबर – फायनल
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -