Supriya Sule : अजित पवारांविषयी संजय राऊत यांचे वक्तव्य बाळबोध

Share

सुप्रिया सुळेंनी संजय राऊतांचाच घेतला समाचार

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधार्‍यांवर टीका करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लक्ष्य केले. आजच्या पत्रकार परिषदेत ‘शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या असून त्यामधील अनेक संस्थांवर अजित पवार आहेत. या संस्थांमधून अजित पवार यांनी बाहेर पडावे’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. मात्र त्यांच्याच आघाडीतील घटक पक्षाच्या राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संजय राऊतांचाच चांगला समाचार घेतला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार आणि आमचे राजकीय मतभेद आहेत, परंतु आमच्यात मतभेद नाहीत. अजितदादांवर केलेल्या अशा टीकेबद्दल मला हसू येते. हे सर्व बाळबोध आहे. या सर्व संस्थांचे काय करायचे ते आम्ही ठरवू. आम्ही नाती नेहमी जपली आहेत. घरातील नातीतर सोडा आज देशात अनेक ठिकाणी आमची नाती तयार झाली आहेत. माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झाले आहेत, पवार कुटुंबियांचे संस्कार आहेत. यामुळे आम्ही सर्वांशी प्रेमाने बोलणार आहोत, संजय राऊत यांचे वक्तव्य हे बाळबोध आहे.

संजय राऊत हे नेहमी वादग्रस्त वक्तव्ये करत असतात. ‘सामना’ वर्तमानपत्रातूनही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. याचा विरोध करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी निदर्शनेही केली. आज मात्र महाविकास आघाडीतीलच नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वक्तव्याला बाळबोध म्हटले. तर दुसरीकडे त्यांनी अजितदादांची बाजू घेतल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची नेमकी भूमिका काय याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Akshaya Tritiya 2024: आज आहे अक्षय्य तृतीया, जाणून घ्या खरेदीचा शुभ मुहूर्त

मुंबई: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला म्हणजेच १० मे २०२४ला अक्षय्य तृतीयेचा(akshay tritiya) सण…

1 hour ago

RCB vs PBKS: बंगळुरुचा ‘विराट’ विजय, ६० धावांच्या फरकाने पंजाबला चारली धुळ…

RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस…

8 hours ago

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे १७ मे रोजी एकाच मंचावर

महायुतीची समारोपाची सभा शिवाजी पार्कवर मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी…

10 hours ago

२०२४मध्ये अयोध्या, लक्षद्वीपला पर्यटकांची पसंती वाढली

मुंबई: टूरिज्म कंपनी मेक माय ट्रिपने बुधवारी जारी केलेल्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली…

10 hours ago

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करू नका या चुका, लक्ष्मी माता होईल नाराज

मुंबई: या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या…

11 hours ago

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी; भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

मुंबई : हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम…

12 hours ago