Luna 25 failed : रशियाची चांद्रमोहिम अपयशी! लूना २५ चंद्रावर कोसळलं

Share

आता भारताच्या मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष…

मुंबई : रशियाच्या अंतराळ संशोधन संस्था रोस्कॉसमॉसने (Roscosmos) रशियाची चांद्रमोहिम (Russia moon mission) अपयशी ठरल्याची अधिकृत बातमी दिली आहे. अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर रशियाचे लुना २५ (Luna 25) अंतराळ यान चंद्रावर कोसळलं आहे. रशियाचं लुना २५ अंतराळयान २१ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार होतं, परंतु त्यापूर्वीच तांत्रिक समस्या उद्भवल्याने ते चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झालं. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच अशा पद्धतीचे मिशन करणार्‍या रशियासाठी ही खूप धक्कादायक बाब आहे.

रशियन अंतराळ संशोधन संस्था रोस्कॉसमॉसने अधिकृतरित्या सांगितलं आहे की, अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर रशियाचे लुना २५ अंतराळ यान चंद्रावर कोसळलं आहे. रोस्कोसमॉसने सांगितलं की, लुना २५ ला प्री-लँडिंग ऑर्बिटमध्ये असताना शंटिंग करण्यात तांत्रिक समस्या उद्भवली होती. यानंतर पुन्हा प्रयत्न करताना लूनाचं लँडर चंद्राच्या अनियोजित कक्षेत पोहोचलं. यानंतर लँडरचा ताबा सुटला आणि ते चंद्रावर क्रॅश झालं.

रोस्कॉसमॉस मधील वैज्ञानिक सातत्याने लँडरचा शोध घेण्याचा आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या प्रयत्नांना यश मिळालं नाही. अखेर ही मोहीम अयशस्वी झाल्याचं रॉस्कॉस्मॉसने आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवरून स्पष्ट केलं. रोस्कोसमॉसने एका निवेदनात म्हटलं आहे की, “लुना २५ नियोजित कक्षेत न जाता वेगळ्या अनियंत्रित कक्षेत गेले आणि त्याची चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाली. यामुळे ही मोहिम अयशस्वी ठरली.”

४७ वर्षांनंतर प्रयत्न

१९७६ साली पार पडलेल्या लूना २४ या मोहीमेनंतर तब्बल ४७ वर्षांनी रशियाने ही चांद्रमोहीम राबवली होती. यामुळेच लूना २५ कडून रशियाला मोठ्या आशा होत्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचं अस्तित्व शोधून, त्याठिकाणी पुढील एक वर्षांपर्यंत संशोधन करण्याच्या उद्देश्याने लूना २५ चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. यानाच्या हलक्या वजनाच्या डिझाईन आणि इंधन साठवणुकीच्या क्षमतेमुळे कमी वेळेत हे यान चंद्राच्या कक्षात पोहचलं होतं. मात्र, चंद्र मोहिम पूर्ण होण्याच्या आधीच हे अंतराळयान क्रॅश झालं.

भारताच्या मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष…

भारताचे चांद्रयान ३ ही चंद्राच्या अतिशय जवळ पोहोचले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने शुक्रवारी सांगितले होते की चांद्रयान ३ ने लँडर मॉड्यूलला चंद्राच्या जवळ जाणारी डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली असून याची स्थिती सामान्य आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्टला सॉफ्ट लँडिंग करण्याची आशा आहे. रशिया आणि भारत दोन्ही देश दोन दिवसांच्या अंतराने चंद्रावर उतरणार होते. आता रशियाचं लुना २५ क्रॅश झाल्यानंतर जगाचं लक्ष भारताच्या चंद्र मोहिमेकडे लागलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…

20 mins ago

Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…

2 hours ago

Mobile SIM Card : तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पण का?

नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…

2 hours ago

Paresh Rawal : मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी!

अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…

2 hours ago

IT Raid : अबब! पलंग, कपाट, पिशव्या आणि चपलांच्या बॉक्समध्ये दडवलेले तब्बल १०० कोटी!

दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…

3 hours ago

Loksabha Election : देशात आणि राज्यात १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…

5 hours ago