Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमुरबाड-म्हसा ऐतिहासिक यात्रेत तुफान गर्दी!

मुरबाड-म्हसा ऐतिहासिक यात्रेत तुफान गर्दी!

आतापर्यंत साडेअकरा लाख भाविकांची हजेरी!

मुरबाड : मुरबाड-म्हसा ऐतिहासिक यात्रेच्या नवव्या दिवशीही अर्थात यात्रेतील दुसऱ्या शुक्रवारी अडीच लाख भाविकांनी श्री खामलिंगेश्वराचे दर्शन घेतले. तसेच स्वेटर, घोंगडी, ब्लॅंकेट, चादर, इत्यादी खरेदी करण्यासाठी यात्रेकरूंची तुफान गर्दी झाल्याचे चित्र शुक्रवारी पुन्हा एकदा यात्रेत दिसून आले.

मुरबाड-म्हसा या ऐतिहासिक वार्षिक यात्रेत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग व शेतकरी मायबाप येऊन प्रथम श्री खांबलिंगेश्वराचे दर्शन घेतात. त्यानंतर शेतकऱ्याला लागणारे साहित्य त्यामध्ये नांगर, नांगराचे फाल, घमेला, फावडा, कुदली, टिकावण, इत्यादी लागणारे साहित्य शेतकरी वर्ग खरेदी करत असतो. त्यामुळे या यात्रेला दरवर्षी वार्षिक यात्रा म्हटले जात आहे. या यात्रेचे स्वरूप पाहता ही यात्रा अगदी महाराष्ट्रात प्रसिद्ध यात्रा म्हणून गणली जात आहे.

तसेच मुरबाड मध्ये नव्याने आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी या संपूर्ण यात्रेवर कडक चोख बंदोबस्तासाठी जवळपास साडेतीनशेच्या वर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे गेली नऊ दिवस यात्रा अगदी शांतमय वातावरणात पार पडत आहे. तसेच यात्रेत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही व घडणार नाही याची स्वतः बाबर हे काळजी घेत आहेत. बाबर यांच्या कार्यकाळातील ही पहिली जत्रा असल्याने त्यांनी या यात्रेवर चोख बंदोबस्त ठेवल्याने बाबर यांचे म्हसा यात्रेत सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -