Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमीमाझा मतदानाचा अधिकार संजय राऊतांना द्यावा - देवेंद्र भुयार

माझा मतदानाचा अधिकार संजय राऊतांना द्यावा – देवेंद्र भुयार

अमरावती (हिं.स.) : माझा मतदानाचा अधिकार संजय राऊत यांना द्यावा, असा खोचक टोला आमदार देवेंद्र भुयार यांनी लगावला आहे. विधानपरिषदेचे मत देताना संजय राऊतांनी माझ्यासोबत राहावे असेही भुयार यांनी म्हटले आहे. संजय राऊतांनीच प्रथम आम्हाला टार्गेट केले. मी लोकसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीसोबत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये देखील मी महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचे भुयार यांनी सांगितले. महाविकास आघाडी प्रचंड भ्रमात असल्याचेही भुयार यावेळी म्हणाले.

राज्यसभेत शिवसेना उमेदवार संजय राऊत यांचा पराभव झाल्यानंतर संजय राऊतांनी पराभवाचे खापर अपक्ष आमदारांवर फोडले होते. तसेच त्या आमदारांची नावे देखील घेतली होती. यावेळी देवेंद्र भुयार यांचे नाव देखील राऊतांनी घेतले होते. त्यानंतर भुयार यांनी आपली भूमिका मांडली होती. आपण महाविकास आघाडीलाचा मतदान केल्याचे त्यांनी सांगितले होते. गुप्त मतदान केल्यामुळेच आमच्यावर आक्षेप घेण्यात आला.

उद्या मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावले आहे. त्यांची उद्या मी भेट घेणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत मी एक मुद्दा मांडणार आहे. तो म्हणजे आम्ही मतदान देतो पण मतदान दिल्याचा पुरावा आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही. मग अशावेळी तुम्ही मान्य कसे कराल? याच्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे संजय राऊतांना मतदानाच्या टेबलच्या समोर उभे करा, मी त्यांना मतदान दाखवतो. जर असे होत नसेल तर निवडणूक आयोगाने विशेष बाब म्हणून आम्हाला परवानगी द्यावी असे भुयार म्हणाले.

महाविकास आघाडीसोबत दोन प्रस्ताव ठेवतो

मी महाविकास आघाडीच्या बैठकीत दोन प्रस्ताव ठेवणार आहे. एक म्हणजे मी मतादान करातान संजय राऊतांना माझ्या मतपेटीजवळ उभे करा, दुसरे म्हणजे माझे मतदान त्यांनाच करु द्या असे भुयार यावेळी म्हणाले. महाविकास आघाडी प्रचंड भ्रमात आहे. त्यांचा भ्रमाचा भोपळा राज्यसभेत फुटला आहे. दुसरा सुद्धा भोपळा फुटू शकतो असे भुयार म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीने गैरसमज करुन न घेता सर्वांना सोबत घेऊन अपक्ष असतील दुसऱ्या पक्षांचे आमदार असतील त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. मतदारसंघातील प्रश्नावर आघाडी सरकारने मार्ग काढावा. मार्ग काढल्यास ते आमदार महाविकास आघाडीसोबत राहतील असे भुयार म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -