Saturday, August 29, 2026

Cooper Hospital : कुपर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संवाद कौशल्याचे प्रशिक्षण

Cooper Hospital : कुपर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संवाद कौशल्याचे प्रशिक्षण

डिजिटल क्ष-किरण यंत्रे बसवा, केमोथेरपी केंद्र त्वरित सुरू करा

भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार अमित साटम यांची मागणी

मुंबई : जुहू येथील मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयातील आरोग्य सुविधांची तातडीने सुधारणा करण्याची मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी केली आहे. येथील कर्मचाऱ्यांची रुग्णांशी तुसडेपणाची, तिरस्करणीय वागणूक दिली जाते हे अत्यंत खेदजनक आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी त्यांना संवाद कौशल्य अर्थात 'सॉफ्ट-स्किल्स'चे प्रशिक्षण देण्याची मागणी आमदार साटम यांनी केली आहे. तसेच क्ष-किरण यंत्रे बसवण्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे. केमोथेरपी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे तसेच कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचारी आणि पुरेसे मनुष्यबळ भरती करण्याची सूचना आमदार साटम यांनी केली. (Cooper Hospital)

महापौर रितू तावडे आणि पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना शुक्रवारी लिहिलेल्या पत्रात आमदार साटम यांनी रुग्णालयाशी संबंधित अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधले. तत्पूर्वी, त्यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच डीएमसी (आरोग्य) शरद उघडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. (Cooper Hospital)

आमदार अमीत साटम यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत चिंता व्यक्त केली. डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांसाठी सॉफ्ट-स्किल्सचे प्रशिक्षण देण्याची गरज असून क्षमता-बांधणी कार्यक्रम राबवण्याची मागणी त्यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणुकीने रुग्णालयाची आणि पर्यायाने पालिकेची प्रतिमा मलीन होत असल्याचे आमदार साटम म्हणाले. क्ष-किरण यंत्रे बसवण्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे. केमोथेरपी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे तसेच कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचारी आणि पुरेसे मनुष्यबळ भरती करण्याची सूचना आमदार साटम यांनी केली. (Amit Satam)

निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे कूपर रुग्णालयाला जवळपास दोन वर्षे डिजिटल रेडिओग्राफी उपकरणांपासून वंचित राहावे लागले. सप्टेंबर २०२४ मध्ये मोबाइल डिजिटल रेडिओग्राफी यंत्रांसाठी निविदा काढण्यात आली. परंतु एकच निविदाधारक उपलब्ध असल्याने आयुक्तांनी एप्रिल २०२५ मध्ये पुन्हा निविदा काढण्याचे (री-टेंडरिंग) निर्देश दिले होते. तरी, विभागाने निविदा काढली नाही आणि हा विषय मार्च २०२६ पर्यंत प्रलंबित ठेवला. त्यानंतर 'जेम' (जेम) पोर्टलवरून सर्व वैद्यकीय उपकरणे व संबंधित साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला, या विलंबाकडेही आमदार अमीत साटम यांनी लक्ष वेधले.

निर्णय होऊनही विभागाने 'जेम' पोर्टलवर निविदा काढली नाही. एकमेव निविदाधारकालाच कंत्राट देण्याचा आग्रह धरला. परिणामी, कूपर आणि सायन रुग्णालयांना दोन वर्षे डिजिटल यंत्रांपासून वंचित राहावे लागले. ही उपकरणे त्वरित कूपर आणि सायन रुग्णालयांच्या सेवेत आणली जातील याबाबत पावले उचलली जावीत आणि विलंबाबाबत चौकशी करावी , अशी मागणी आमदार साटम यांनी पत्रात केली आहे. (Cooper Hospital)

पश्चिम उपनगरातील कर्करोग रुग्णांची सोय करण्यासाठी, प्रस्तावित केमोथेरपी केंद्र (ज्यासाठी आधीच निविदा काढण्यात आली आहे.) लवकर कार्यान्वित करावे. तसेच, बाहेर जन्मलेल्या बालरुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था करावी आणि अशा रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा, अशी सूचना आमदार साटम यांनी केली.

१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पालिका रुग्णालयामध्ये महाराष्ट्र सुरक्षा दलाचे पुरेसे सुरक्षा कर्मचारी कायमस्वरूपी तैनात करावेत. पुढील ३ महिन्यांत आवश्यक मनुष्यबळ भरती करावे, तसेच डायलिसिस केंद्राची क्षमता ६ वरून २० पर्यंत वाढवून प्रक्रिया सुलभ करावी, असा आग्रह आमदार साटम यांनी पालिका प्रशासनाकडे धरला. (Amit Satam)

पालिका रुग्णालयातील स्वच्छता आणि देखभालीवरही त्यांनी टीका केली. 'क्वालिटी-कम-कॉस्ट-बेस्ड सिलेक्शन' प्रणाली अंतर्गत कठोर उत्तरदायित्व अटींसह 'हाऊसकीपिंग'ची नवीन निविदा काढण्यात यावी. पुरेशा उत्तरदायित्वासह नामांकित हाऊसकीपिंग एजन्सीची नियुक्ती करावी, जेणेकरून रुग्णालयातील स्वच्छता खाजगी रुग्णालयाच्या तोडीस तोड असेल,असे आमदार साटम यांनी पालिका प्रशासनाला बजावले. (Amit Satam)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा