प्रसूती विभागातील तीन घटनांचा घेतला सविस्तर आढावा; डॉक्टरांशी साधला संवाद
मुंबई : राजावाडी रुग्णालयातील प्रसूती विभागात घडलेल्या तीन अनपेक्षित घटनांबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीष भांदिर्गे यांनी शुक्रवारी राजावाडी रुग्णालयाला भेट देत संपूर्ण घटनेची माहिती घेतली. (Harish Bhandirge)
यावेळी हरीष भांदिर्गे यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांसह प्रसूती विभागातील संबंधित डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या तीनही प्रकरणांमध्ये नेमकी परिस्थिती काय होती, रुग्णांना कोणत्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, करण्यात आलेल्या तपासण्या, उपचारपद्धती तसेच आपत्कालीन परिस्थितीत करण्यात आलेल्या वैद्यकीय कार्यवाहीची माहिती त्यांनी जाणून घेतली. v
हिरा भंडारी 37 आठवड्यांच्या गर्भावस्थेतील रुग्ण, रेहाना बेगम खान यांची दुसरी प्रसूती 33 आठवड्यांच्या गर्भावस्थेतील रुग्ण आणि तर तिसऱ्या प्रकरणात ४० आठवडे + २ दिवसांच्या गर्भावस्थेतील रुग्ण या तिन्ही प्रकरणांबाबत रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलेल्या वैद्यकीय कार्यवाहीची तसेच उपलब्ध वैद्यकीय सुविधा व प्रोटोकॉलनुसार करण्यात आलेल्या उपचारांची माहितीही आरोग्य समिती अध्यक्षांनी घेतली. (Harish Bhandirge)
मुंबई : केंद्र सरकार, जागतिक बँक आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) भूजल पातळी वाढवण्यासाठी मिळणारा निधी आता राज्यातील तहानलेल्या व ...
राजावाडी रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. प्रसूती विभागातही नियमितपणे प्रसूती आणि सिझेरियन शस्त्रक्रिया होत असतात. त्यामुळे अशा संवेदनशील विभागातील रुग्णसेवा अधिक प्रभावी, सुरक्षित आणि तत्पर राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा सातत्याने आढावा घेणे गरजेचे आहे. (Harish Bhandirge)
यावेळी हरीष भांदिर्गे यांनी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधत रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही, आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक वैद्यकीय प्रतिसाद तत्काळ मिळेल आणि रुग्णसेवेच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा होईल यावर भर दिला.
रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महापालिका रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांचा नियमित आढावा घेण्यात येईल. रुग्णांना दर्जेदार आणि वेळेवर उपचार मिळावेत यासाठी आवश्यक त्या सुधारणा व उपाययोजनांसाठी रुग्णालय प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्यात येईल, असे हरीष भांदिर्गे यांनी यावेळी स्पष्ट केले. (Harish Bhandirge)






